#RenuRasoi
#HealthyFood #Tasty #Vegetarian
#ProteinRich #DahiPalak
Dahi Palak – Creamy, Tangy & Delicious!
A traditional Maharashtrian-style palak bhaji with the goodness of spinach, besan and sour buttermilk. A simple, tasty and wholesome dish for everyday meals! 😋
Ingredients
1 Cup... 150 ml
*Chopped Spinach (palak) – 4 cup
*Besan (gram flour) – ½ cup
*Sour buttermilk – 2½ cups
*Garlic cloves, chopped – 12
*Green chillies, chopped – 4
*Oil – 3 tbsp
*Turmeric powder – ½ tsp
*Red chilli powder – ¼ tsp
*Fenugreek seeds (methi dana) – 1/4 tsp
*Mustard seeds (rai) – 1/4 tsp
*Cumin seeds (jeera) – 1/4 tsp
*Salt – 1 tsp
Method
*Heat oil in a pan. Add fenugreek seeds, mustard seeds and cumin seeds.
*Add chopped garlic and green chillies. Sauté until the garlic turns golden brown.
*Add turmeric powder, red chilli powder and chopped Spinach. Sauté on medium flame until all the moisture from spinach evaporates.
*Mix besan and sour buttermilk until smooth and lump-free.
*Pour the mixture into the pan, stirring continuously.
*Cook on medium-low heat until the mixture thickens and the besan is thoroughly cooked.
*Serve hot with steamed rice or fresh rotis.
*For Better Taste – Garlic Tadka
Heat 1 tbsp oil. Add a pinch of mustard seeds. Once they splutter, add a few chopped garlic cloves and 1 broken dry red chilli. Fry until the garlic turns golden brown. Switch off the gas and immediately pour the tadka over the vegetable.
*Enjoy this simple, tangy and delicious homemade bhaji!
#रेणूरसोई
#आरोग्यदायी #चविष्ट #शाकाहारी
#प्रथिनयुक्त #दहीपालक
दही पालक – चविष्ट, आंबट-गोडसर आणि मऊसूत! 😋
पालक, बेसन आणि आंबट ताक यांचा वापर करून बनवलेली पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची दही पालक भाजी.
रोजच्या जेवणासाठी पौष्टिक, चविष्ट आणि झटपट तयार होणारी भाजी!
साहित्य
१ वाटी = १५० मिली
*स्वच्छ धुऊन चिरलेला पालक – ४ वाट्या
*बेसन – ½ वाटी
*आंबट ताक – २½ वाट्या
*लसूण पाकळ्या, चिरलेल्या – १२
*हिरव्या मिरच्या, चिरलेल्या – ४
*तेल – ३ टेबलस्पून
*हळद – ½ टीस्पून
*लाल तिखट – ¼ टीस्पून
*मेथीदाणे – ¼ टीस्पून
*मोहरी – ¼ टीस्पून
*जिरे – ¼ टीस्पून
*मीठ – १ टीस्पून
कृती
*कढईत तेल गरम करून त्यात मेथीदाणे, मोहरी आणि जिरे घाला.
*त्यात चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
*हळद, लाल तिखट आणि चिरलेला पालक घाला. मध्यम आचेवर पालकातील सर्व पाणी आटेपर्यंत शिजवा.
*एका भांड्यात बेसन आणि आंबट ताक एकत्र करून गुठळ्या न राहता छान मिसळून घ्या.
*हे मिश्रण पालकात घाला आणि सतत ढवळत राहा.
*मंद-मध्यम आचेवर बेसन व्यवस्थित शिजून भाजी घट्ट होईपर्यंत शिजवा.
*गरमागरम दही पालक भाजी पोळी किंवा वाफाळलेल्या भातासोबत सर्व्ह करा.
*अधिक चवीसाठी – लसणीची फोडणी
एका छोट्या पातेल्यात १ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात चिमूटभर मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर काही चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि १ तुकडा केलेली सुक्या लाल मिरची घाला. लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. गॅस बंद करून लगेच
ही फोडणी भाजीवर घाला.
साधी, चविष्ट आणि आंबट दही पालक भाजी नक्की करून पाहा! ❤️

Comments
Post a Comment