Skip to main content

Posts

Peanuts Ladoo

#रेणूरसोई शेंगदाणे लाडू शेंगदाण्याचे हे लाडू अतिशय मऊ, चवदार चविष्ट आहेत. छोट्या-मोठ्या भुकेसाठी उत्तम आहेत लहान मोठे सगळे खाऊ शकतात व सर्वांना अतिशय आवडतात.  गुलाबी थंडीत तर गुळ व दाणे , किंवा तिळ व गुळ अतिशय आवश्यक आहे .... त्वचा स्निग्ध होते....शरीराला उर्जा मिळते... बिस्कीट खाण्यापेक्षा शतपट पौष्टिक.... तेव्हा बघूया शेंगदाण्याचे लाडू... साहित्य.... *शेंगदाणे.... 2 वाटी 1 वाटी...150 मिली *गुळ चिरून... 1 वाटी *साजूक तूप... 1 टिस्पून *दुध... 1 टेबलस्पून *वेलची पूड...1/4 टिस्पून... ऐच्छिक कृती... *शेंगदाणे मंद आचेवर खमंग भाजून घ्या. गार झाल्यावर साले न काढता, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटताना अधूनमधून मिक्सर चे झाकण काढून चमचा वापरून वर खाली करून घ्या. जाडसर वाटले तरी चालेल. हा शेंगदाणे कूट एका पसरट भांड्यात किंवा परातीत काढून घ्या. *गॅस वर  एका जाड बुडाच्या कढईत तूप घालून लगेच गुळ व दुध घालून, चमच्याने ढवळत राहावे. गुळ विरघळला कि गॅस बंद करावा. हि कृती मंद आचेवर करा. *वेलची पूड घालावी, व हा पाक परातीतील शेंगदाणे कूट मिश्रणात घालून चमच्याने छान एकत्र करावे. दोन चार मिनिटे छान एकत
Recent posts

Mini Vegie Uttapam...

 #रेणू रसोई  मिनी व्हेजी उत्तपम  हे मिनी व्हेजी उत्तपम कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं यांनी परिपूर्ण आहेत, सोबतच जीवनसत्त्वे,  चवदार मसाले तसेच भरपूर भाज्या युक्त आहेत.  अतिशय पौष्टिक व चवदार देखील आहेत.  नाश्त्यासाठी, पार्टी स्नॅक्ससाठी, टिफिन मध्ये नेण्यासाठी मस्तच आहे  साहित्य  *तांदूळ .. 1वाटी 1 वाटी... 150 मिली  *हिरवी मुग डाळ ... 1 वाटी  *मेथी दाणे ... 1 टिस्पून  *किसलेले गाजर ... 1 वाटी  *कांदा पात चिरून ... 1 वाटी  *किसलेले आले ... 1 टिस्पून  *हिरवी मिरची .. 2  *मिरेपूड ... 1/2 टीस्पून  *मीठ ... 2 टिस्पून  *तिखट ... 1 टिस्पून  *शोप जाडसर कुटून... 1 टिस्पून  *जिरे .. 1/2 टीस्पून  *नारळ तेल .. 1/2 वाटी  कृती ...  *तांदूळ आणि डाळ धुवून 4 तास पाण्यात भिजवून ठेवा, भिजवताना मेथीचे दाणे घाला.  *मिक्सरमधून गुळगुळीत  बारीक वाटून घ्यावे.  * हे पीठ 7 ते 8 तास आंबू द्या.  *खोबरेल तेल सोडून बाकी सर्व साहित्य आंबवलेल्या पिठात घाला.  *छान व्यवस्थित एकत्र मिसळा.  *लोखंडी तवा 2 मिनिटे कोरडाच गरम करा, 1/2 टिस्पून नारळाचे तेल पसरवून घ्या.   3..4 मिनिटे गरम होऊ द्या. *असे केल्याने उत्तपम किंवा डोसा झटप

Jaggery Shankarpale

 गुळाचे शंकरपाळे #रेणूरसोई हे शंकरपाळे अतिशय खमंग व खुसखुशीत लागतात. शंकरपाळे दूध, चहा व कॉफी कशा सोबत ही छान लागतात. दिवाळीच्या चटक-मटक फराळाचं सोबत मध्येच थोडेसे गोड खायला मधुर लागतात. साहित्य-  *गूळ...1 वाटी 1 वाटी... 150 मिली. *तुप...1/2 वाटी  *पाणी...3/4 वाटी *मीठ... चिमूटभर...ऐच्छिक *बेसन... 3 टेबलस्पून *कणिक... 3.5 ते 4 वाटी कृती... * प्रथम भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यामध्ये चिरलेला गूळ , तूप व मीठ घाला. अधूनमधून ढवळत गूळ पूर्ण विरघळून घ्या. गॅस बंद करा. *हे पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात कणिक + डाळीचे पीठ मिसळून गोळा करा आणि तासभर झाकून ठेवा. कणिक कमी जास्त प्रमाणात लागू शकते. *नंतर त्याची मध्यम जाडीची पोळी लाटून शंकरपाळे कापा. *एका कढईत तेल तापवून ,तेल गरम झाल्यावर आच कमी करून, खमंग तळून घ्यावे.  * हे शंकरपाळे गार झाल्यावर छान खुसखुशीत लागतात. पुर्ण थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

Sweet Shankarpale

  गोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे  हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल...  1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा...  5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून  गार होऊ द्यावे.  *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा  थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.  * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.

Bhel

  Bhel #RenuRasoi Bhel All time favourite snacks... Crunchy..munchy... Tangy😋😋😋😋 Favourite from Kids to Elders .... Ingredients.... *Murmure / puffed rice...  6 Cup 1 Cup...150 ml *Gathi papadi... 1 Cup *Shev... 1 Cup *Khari Boondi... 1/2 cup *Peanuts... 1/2 Cup *Boiled and Diced Potatoes... 1 Cup *Chopped Onion...1/2 cup *Chopped Tomatoes... 1/4 Cup *Chopped coriander... 3 tablespoon *Green Chutney.... 1/2 Cup *Tamarind Chutney... 1 Cup *Salt and Red chillies powder.... as per your requirement Method.... *Heat 1 tablespoon oil in a pan, add peanuts and saute them on low flame till crisp. Set them aside, let it become cool. *Mix Murmure, boiled diced Potatoes, 1/4 th cup chopped Onions , A little Coriander and tomato, 1/2 cup Shev, Papadi, Boondi, Fried peanuts, 1 tbspn Green Chutney, 3 tbspn Tamarind Chutney, Red Chillies Powder and Salt as per your choice. Add all ingredients as per your choice. * While serving once again add a little green chutney, tamarind Chutney and garnish w

Boondi Raita

  #RenuRasoi #Boondi #Raita #Khari Boondi Raita is very favourite of all 😋😋😋😋 When prepared with the freshly home made Boondi and Curd it tastes amazing 👌👌 Ingredients... *Homemade Khari Boondi...1.5 Cups 1Cup... 150 ml *Homemade Curd... 2 Cups *Sugar... 2 tsp (Optional) *Salt... 1/2 tsp *Roasted Cumin seeds powder....  1/2 tsp *Green chillies...2 *Chopped coriander... 1 tbspn *Chopped fresh mint leaves..1/2 tbspn ( optional) Method... *Take 4 cups lukewarm water, ( not hot), pour this water in a big pan.  *Add Khari Boondi in that lukewarm water, let it soak only for 2 minutes. Squeeze out the water by pressing Khari Boondi in your hands. Keep it aside. This process will reduce the oil contents of Boondi  * Slit the green chillies, and cut it into big pieces. *In another pan beat the Curd well and add 1/2 cup water.  By adding water Raita will not become thick. *Now add chopped green chillies, coriander, mint leaves, cumin seeds powder, sugar and salt in the curd. Mix well, then

Cabbage Masalebhat

 #रेणूरसोई #मसालेभात #पानकोबी पानकोबी चा मसालेभात सणा चा स्वयंपाक करताना कांदा लसूण घालत नाही. तेंव्हा हा मसालेभात करून पहा... हा मसालेभात फार चवदार व स्वादिष्ट लागतो. भरपूर भाजी व योग्य प्रमाणात मसाल्यांचा वापर भाताला अधिक खमंग व सुगंधी बनवतो. हा भात जेंव्हा घरी शिजत असतो तेंव्हा आजुबाजुचा परीसर अप्रतिम अशा सुगंधाने दरवळत असतो. पावसाळा  किंवा हिवाळ्यात सोबत हवी गरमागरम कढी ....तर उन्हाळ्यात मस्त थंडगार ताक किंवा मठ्ठा... सोबत जिलबी असेल तर ... अतिशय अप्रतिम 😋😋😋😋 साहित्य... *सुगंधी तांदूळ... एक वाटी 1वाटी...150 मिली *पानकोबी बारीक चिरून...2 वाटी *शेंगदाणे... 1/4 वाटी *सुके खोबरे कीस... 1/4 वाटी *कोथिंबीर चिरून... अर्धी वाटी *हिरवी मिरची चिरून...3 *आलेकीस....1 टिस्पून *कढीपत्ता ...15 पाने *तेल... 5 टेबलस्पून *हळद...1/2 टिस्पून *मीठ...1 टिस्पून *गरम मसाला...1/2 टिस्पून *गोडा मसाला...1 टिस्पून *धनेपूड...1 टिस्पून  कृती... *सर्व प्रथम शेंगदाणे स्वच्छ धुवून पाणी घालून भिजवून घ्या. कमीतकमी  30 मिनिटे. *तांदूळ स्वच्छ धुवून, पाणी निथळून बाजूला ठेवून द्या. *खोबरे कीस, मिरची, कोथिंबीर, कढीपत