Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

Dadpe Pohe

  #रेणूरसोई  #दडपे #पोहे हे पोहे अतिशय चवदार लागतात व पटकन होतात.  आपण पोहे दडपून मुरायला ठेवतो म्हणून याचे नाव दडपे पोहे असे आहे. ही रेसिपी प्रत्येक घरी वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते. साहित्य  एक वाटी... दीडशे मिली लिटर  •पातळ / नायलॉन पोहे ...दोन वाट्या  •कांदा चिरून... दोन टेबलस्पून  •शेंगदाणे ....एक टेबलस्पून  •ओले खोबरे ...दोन टेबलस्पून  •तेल... दोन टेबलस्पून  •मोहरी ...पाव टीस्पून  •मेतकूट... एक टीस्पून  •तिखट... अर्धा टी स्पून  •मीठ ...अर्धा टीस्पून  •हिरवी मिरची चिरून... एक टीस्पून  •कोथिंबीर चिरून... एक टेबलस्पून  •किसलेली कैरी एक टेबलस्पून किंवा लिंबू रस दोन टीस्पून •साखर ...अर्धा टी स्पून •पोह्याचा पापड तळून...एक कृती... •प्रथम एका छोट्या कढ‌ईत तेल तापवून शेंगदाणे खमंग तळून घ्यावेत व बाजूला काढावेत .नंतर त्याच तेलात मोहरी घालून मोहरी तडतडल्यावर गॅस बंद करावा. ही आपली फोडणी तयार झाली.  •एका पसरट भांड्यात पातळ पोहे त्याच्यावर मेतकूट, साखर, मीठ ,तिखट ,मिरचीचे तुकडे , चिरलेला कांदा व कोथिंबीर, तळलेले शेंगदाणे, किसलेली कैरी ,खोबऱ्याचा कीस, सगळे घालून घ्यावे व छान कालवावे.  •नं

Maharashtrian Thali

 शेंगदाण्याची आमटी  याच आमटीला काही भागात "झिरकं" किंवा "खळगुट"असे पण म्हणतात .अतिशय झटपट होणारी पौष्टिक व चवदार चविष्ट अशी ही आमटी नक्की करून पहा. भाकरी, पोळी, भात कशासोबतही छान लागते. साहित्य... १ वाटी... १५० मिली  *भाजलेले शेंगदाणे... 1/2 वाटी  *हिरवी मिरची... 5 *चिरलेली कोथिंबीर... 1/2 वाटी  *जिरे...1/4 टिस्पून  *मीठ... 3/4 टिस्पून  *तेल... 3 टेबलस्पून  *हळद... 1 टिस्पून  *मोहरी... 1/4 टिस्पून  *लिंबू रस... 2 टिस्पून  कृती... *मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर व जिरे घालून पाणी न घालता वाटून घ्या.  *नंतर त्यात दोन टेबलस्पून पाणी घालून छान एकजीव वाटून घ्या.  *एका लोखंडी कढईत तीन टेबलस्पून तेल घाला व मोहरी घालून फोडणी करून घ्या. नंतर हळद घालून शेंगदाण्याचे वाटलेले मिश्रण घाला व मंद आचेवर बाजूने तेल सुटेपर्यंत परतून घ्या.  *नंतर त्या कढईत दोन वाट्या पाणी व मीठ घालून तीन चार मिनिटे उकळू द्या.  *आपली शेंगदाण्याची आमटी तयार ...वरून लिंबूरस घालून गरम गरम आमटी सर्व्ह करा. काकडी चा कोरडा हा खास विदर्भातील पदार्थ आहे. हा कोरडा करण्यासाठी शक्यतो