Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

Ukadiche Modak

  #रेणूरसोई  #मोदक #उकडीचे  उकडीचे मोदक  विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी  *पाणी... 1 वाटी  *मीठ... 1/4 टिस्पून  *तुप... 1 टिस्पून  *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून  *गुळ चिरून... 1/2 वाटी  *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे.  आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी.  *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे ‌. * नंतर उकड

Stuffed Dal Dhokali

#रेणूरसोई #वरण #फळं #stuffed भरली वरण फळं हा एक one dish meal चा प्रकार आहे. थोडी पुर्व तयारी मात्र करावी लागते .... आमच्या घरी बरेच वेळा हा प्रकार होतो... अतिशय चवदार चविष्ट व पुर्ण जेवण होते, सोबतीला आवडत असतील तर कुरकुरीत पापड... हा पदार्थ मी अगदी घरी जेवायला आलेल्या तरूण भाचे मंडळींसाठी पण केला आहे...व सर्वांना फार आवडतो .  मसाल्यां व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट आणि प्रथिने युक्त... असल्याने पौष्टिक व समतोलआहार आहे....  साहित्य ...  वरणा साठी  * तुरीची डाळ ... 1 वाटी 1 वाटी... 150 मिली  * मीठ ... 1.5 टीस्पून  * हिरव्या मिरच्या ....4 चिरून  * तेल ... 4 टेबलस्पून  * मोहरी  ... 1/4 टीस्पून  * हिंग पुड ... 1/4 टीस्पून  * कढीपत्त्याची पाने...10..12  * चिंचेचा कोळ... 1 टेबलस्पून  * गुळ ... 1/2 टेबलस्पून  * गोडा मसाला... 1 टिस्पून  फळांसाठी ...  * गव्हाचे पीठ ... 1 वाटी  * तेल ... 3 टीस्पून  * मीठ ... 3/4 टीस्पून  * लाल तिखट ... 1/2 टीस्पून  * हळद ... 1/4 टीस्पून  * जिरे ... 1/4 टीस्पून  * ओवा ... 1/4 टीस्पून मसाला/ आतील सारण... *उकडलेले बटाटे, साले काढून किसून...1.5 वाटी *आले लसूण वाटून...1/

Peanuts Ladoo

#रेणूरसोई शेंगदाणे लाडू शेंगदाण्याचे हे लाडू अतिशय मऊ, चवदार चविष्ट आहेत. छोट्या-मोठ्या भुकेसाठी उत्तम आहेत लहान मोठे सगळे खाऊ शकतात व सर्वांना अतिशय आवडतात.  गुलाबी थंडीत तर गुळ व दाणे , किंवा तिळ व गुळ अतिशय आवश्यक आहे .... त्वचा स्निग्ध होते....शरीराला उर्जा मिळते... बिस्कीट खाण्यापेक्षा शतपट पौष्टिक.... तेव्हा बघूया शेंगदाण्याचे लाडू... साहित्य.... *शेंगदाणे.... 2 वाटी 1 वाटी...150 मिली *गुळ चिरून... 1 वाटी *साजूक तूप... 1 टिस्पून *दुध... 1 टेबलस्पून *वेलची पूड...1/4 टिस्पून... ऐच्छिक कृती... *शेंगदाणे मंद आचेवर खमंग भाजून घ्या. गार झाल्यावर साले न काढता, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटताना अधूनमधून मिक्सर चे झाकण काढून चमचा वापरून वर खाली करून घ्या. जाडसर वाटले तरी चालेल. हा शेंगदाणे कूट एका पसरट भांड्यात किंवा परातीत काढून घ्या. *गॅस वर  एका जाड बुडाच्या कढईत तूप घालून लगेच गुळ व दुध घालून, चमच्याने ढवळत राहावे. गुळ विरघळला कि गॅस बंद करावा. हि कृती मंद आचेवर करा. *वेलची पूड घालावी, व हा पाक परातीतील शेंगदाणे कूट मिश्रणात घालून चमच्याने छान एकत्र करावे. दोन चार मिनिटे छान एकत