#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
गुळाचे शंकरपाळे #रेणूरसोई हे शंकरपाळे अतिशय खमंग व खुसखुशीत लागतात. शंकरपाळे दूध, चहा व कॉफी कशा सोबत ही छान लागतात. दिवाळीच्या चटक-मटक फराळाचं सोबत मध्येच थोडेसे गोड खायला मधुर लागतात. साहित्य- *गूळ...1 वाटी 1 वाटी... 150 मिली. *तुप...1/2 वाटी *पाणी...3/4 वाटी *मीठ... चिमूटभर...ऐच्छिक *बेसन... 3 टेबलस्पून *कणिक... 3.5 ते 4 वाटी कृती... * प्रथम भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यामध्ये चिरलेला गूळ , तूप व मीठ घाला. अधूनमधून ढवळत गूळ पूर्ण विरघळून घ्या. गॅस बंद करा. *हे पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात कणिक + डाळीचे पीठ मिसळून गोळा करा आणि तासभर झाकून ठेवा. कणिक कमी जास्त प्रमाणात लागू शकते. *नंतर त्याची मध्यम जाडीची पोळी लाटून शंकरपाळे कापा. *एका कढईत तेल तापवून ,तेल गरम झाल्यावर आच कमी करून, खमंग तळून घ्यावे. * हे शंकरपाळे गार झाल्यावर छान खुसखुशीत लागतात. पुर्ण थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.