#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi Coconut Pedha Quick n Yummy... No need of cooking. Ingredients... *Dessicated Coconut...1 Cup *MilkPowder....1/2 Cup *Powdered Sugar...1/4 Cup *Milk...as required *Cardamom powder...a pinch Method... *Mix Dessicated Coconut, Milk Powder, Sugar, & Cardamom powder. *Add Milk carefully to make a soft dough. *Make a Gooseberry size balls, roll like Pedha. *Decorate with dry fruits of your choice. #रेणूरसोई #खोबऱ्याचे #पेढे खोबऱ्याचे पेढे अतिशय स्वादिष्ट व झटपट होतात. गॅस विरहित रेसिपी आहे... साहित्य... *डेसिकेटेड खोबरे कीस... 1 वाटी *मिल्क पावडर...1/2 वाटी *पिठीसाखर...1/4 वाटी *वेलची पूड...1 चिमूटभर *दुध... गरजेनुसार *सुक्या मेव्याचे काप... आवडीनुसार कृती... *खोबरे कीस, मिल्क पावडर, पिठीसाखर व वेलची पूड एकत्र करा. *अगदी थोडे थोडे दुध घालून छान मउसर गोळा करा. *छोट्या आवळ्या एवढे गोळे करून, पेढ्याचा आकार द्या. *वरून सुक्या मेव्याचे काप लावून सजवावे.