#रेणूरसोई मेथी चे थालीपीठ बरेच वेळा थालीपीठ खायची इच्छा होते. पण घरात भाजणी नसते अशा वेळेला हे खालील मिश्र पीठ वापरून केलेले थालीपीठ खूप कुरकुरीत होते व सुंदर आणि चवदार लागते. मेथी व कांद्याचा खमंग सुवास घरभर दरवळतो... थालीपीठ चवदार लागते पाहू या मिश्र पीठाने केलेले थालीपीठ.. *बाजरी पीठ... एक वाटी *मका पीठ... एक वाटी *बेसन ...अर्धी वाटी *चिरलेली मेथी.. दोन वाटी *चिरलेला कांदा ...एक वाटी *हिरव्या मिरच्या चिरून ...तीन *तिखट ...दीड टीस्पून *मीठ ... दिड टीस्पून *चिमूटभर ओवा *हळद ...पाव टी स्पून *तीळ... दोन टीस्पून कृती... *सगळे साहित्य एकत्र करून पाण्याने भिजवणे. *भाकरीच्या पीठ सारखं सैल हवे.. तव्यावर तेल पसरवून हाताने थालीपीठ पाण्याच्या हाताने थापून घ्या. *थालीपीठात चार पाच भोक पाडून त्या मध्ये तेल घालून व बाजूला पण तेल सोडून , झाकण ठेवून एका बाजूने कुरकुरीत भाजून दुसऱ्या बाजूने *झाकण न ठेवता कुरकुरीत लाल करून घ्या. आपले खमंग थालीपीठ तयार आहे..