#RenuRasoi
#Kadhi #Gole #Proteinrich #Complete
Kadhi Gole कढी गोळे
It is raining. If you want something nice ,healthy, nutritious food, try eating Kadhi Goles with rice.
Gole means small dumpling made of chana dal.
Due to heavy rain, sometimes there are no vegetables available in the home.
Then try these Kadhi Gole by using the ingredients that are available easily in the home.
Just follow what I have shared while making this recipe. You will definitely get a great dish.
Ingredients...
One cup... 150 ml
For the balls / Gole
*Chana dal... 1/2 cup
*Green chillies... 2
*Garlic pods... 4
*Ginger grated... 1/2 tsp
*Turmeric... a pinch
*Cumin seeds... 1/4 tsp
*Salt... 1/2 tsp
Method...
*Wash the Chana dal and soak it in 2 cups of water for at least 2 hours. The dal soaks well in 2 hours.
*Strain all the water in the colander.
*In a mixer bowl, add green chilli, garlic, ginger, turmeric, salt and soaked chana dal.
Grind the dal on pulse mode without adding any water.
*Put it in a bowl.
*Mix it well with your hands, make 9 small balls of it. Keep these balls in a plate.
*We will Cook them in kadhi.
For Kadhi...
*Sour curd... 1.5 cups . Beat the curd by adding 1/2 cup of water in it.
*Besan/. Chickpea flour... 2 tablespoons
*Water... 3 cups
*Sugar... 1 teaspoon... optional
*Salt... 1.5 teaspoons
*Curry leaves... 10-12
*Ginger... 1/2 teaspoon
*Green chilies.. 2 chopped
*Coriander chopped... 1 tablespoon
*Oil... 3 tablespoons
*Mustard and cumin seeds... 1/2 teaspoon each
*Hing/ Asafoetida powder... 1/2 teaspoon
*Turmeric... 1/4 teaspoon
Method...
* In a mixer jar add chickpea flour, sugar, salt, beaten curd and churn well.
*Heat oil in a thick-bottomed steel kadhai.
*Add Mustard and Cumin seeds. After they splutter add Turmeric, green chilli pieces, curry leaves, grated ginger, little chopped coriander and Asafoetida. Saute for a minute.
*Immediately,add the curd mix from the mixer and mix well.
*Add 3 cup water in the Mixer pot and mix well. Pour this in the kadhi mix.
*Now let this kadhi boil on medium heat.
Keep stirring with a spoon. Do not let the curry overflow from the pan.
*When kadhi start boiling add already prepared chana dal balls one by one.
*Do not stir with the spoon for two to three minutes. The balls may burst. Then keep stirring gently with a spoon.
*When the balls are cooked, they float on the surface.
*Let it simmer for another four to five minutes on low heat.
*Adjust the sugar and salt as per your taste.
*Turn off the gas and add the remaining finely chopped coriander.
*Your Kadhi gole are ready.
Rice...
*Rice...1 Cup
*Water...3 Cups
Method...
*First clean the rice with water for two to three times.
*In steel pan, add 3 Cups water and washed of rice. Put on the gas on low flame.
Rice will be ready in ten to twelve minutes.
Once the water is completely evaporated, cover the pot.
*If you will cook rice this way it tastes better.
Chili oil
*Oil...2 tablespoons
*Red chili powder...1 teaspoon
*Mustard seeds...1/4 teaspoon
Method...
*Take one teaspoon of red chili powder in a steel bowl.
*Heat two tablespoons of oil in a cast iron pan and add mustard. When the mustard crackles, switch off the Gas.
After 2 minutes pour this hot oil on the chilli powder in a bowl.
*Your spicy red chili oil is ready.
How to serve...
*In a plate, serve hot rice,.Pour hot Kadhi and Gole. Add chilli oil as per your taste.
Enjoy Kadhi and Rice by crushing Gole in it.
#रेणूरसोई
#कढी #गोळे #प्रोटीन #परिपूर्ण
कढी गोळे
भरपूर पाऊस पडतो आहे. काही तरी छान चमचमीत जेवण, तरीही पौष्टिक आहार हवा असेल तर कढी गोळे व भात नक्की खाऊन पहा.
बरेच वेळा पावसाळ्यात चांगली भाजी मिळत नाही. तेंव्हा घरीच असलेले साहित्य वापरून हे कढी गोळे नक्की करून पहा.
फक्त हि रेसिपी करताना मी सांगितले आहे तशीच करून पहा. हमखास उत्तम पदार्थ तयार होईल.
साहित्य...
एक वाटी... 150 मिली
गोळे करण्यासाठी
*हरबरा डाळ...1/2 वाटी
*हिरवी मिरची... 2
*लसूण पाकळ्या... 4
*आले किसून... 1/2 टिस्पून
*हळद... चिमूटभर
*जिरे ... 1/4 टिस्पून
*मीठ... 1/2 टिस्पून
कृती...
*हरबरा डाळ स्वच्छ धुवून, 3 वाटी पाणी घालून कमीत कमी 2 तास भिजवून घ्या. 2 तासात डाळ छान भिजते.
*एका रोळी मध्ये, डाळ घालून पाणी काढून टाकावे.
*मिक्सर च्या भांड्यात मिरची, लसूण, आले किस, हळद, जीरे, मीठ व भिजवलेली हरबरा डाळ घालून पल्स मोडवर पाणी न घालता बारीक वाटून घ्या.
*वाटून झाले कि एका भांड्यात काढून घ्या.
*हाताने छान एकत्र करून , त्याचे छोटे छोटे 9 गोळे करून घ्यावेत. एका ताटलीत हे गोळे करून ठेवा.
*नंतर आपण हे गोळे कढईमध्ये उकळून शिजवून घेणार आहोत.
कढी साठी...
*आंबट दही... 1.5 वाटी छान घुसळून घ्यावे. व त्या मध्ये 1/2 वाटी पाणी घालून दाट ताक करून घ्या.
*बेसन... 2 टेबलस्पून
*पाणी... 3 वाटी
*साखर... 1 टिस्पून... ऐच्छिक
*मीठ... 1.5 टिस्पून
*कढीलिंब पाने... 10-12
*आले किसून... 1/2 टिस्पून
*हिरवी मिरची.. 2 मोठे तुकडे करून
*कोथिंबीर चिरून... 1 टेबलस्पून
*तेल... 3 टेबलस्पून
*मोहरी व जिरे... 1/2 टिस्पून प्रत्येकी
*हिंग पूड... 1/2 टिस्पून
*हळद ... 1/4 टिस्पून
कृती...
*मिक्सर मध्ये बेसन, साखर, मीठ,व घुसळलेले दही घालून छान एकत्र घोटून घ्या.
*जाड बुडाच्या स्टीलच्या कढईत किंवा भांड्यात तेल तापवा. त्यात मोहरी व जिरे घालून तडतडल्यावर हळद, मिरचीचे तुकडे ,कढिलिंबाची पाने ,किसलेले आले, चिरलेला अर्धा कोथिंबीर व हिंग घालून एक मिनिट परतून घ्या.
*लगेच मिक्सर मधून घोटून घेतलेले दह्याचे मिश्रण घाला व छान एकत्र करून घ्या.
*मिक्सरच्या भांड्यातच तीन वाट्या पाणी घालून ते पाणी पण कढी करत असलेल्या भांड्यात घाला.
*आता मध्यम आचेवर ही कढी छान उकळू द्या .
मधून मधून चमच्याने ढवळत रहा. कढी कडे लक्ष द्या अजिबात उतू गेली नाही पाहिजे.
*पूर्ण कढईभर छान उकळी आली की हळूहळू एक एक वाटलेल्या हरबऱ्याच्या डाळीचे गोळे घाला.
*दोन-तीन मिनिटे चमचा वगैरे घालून ढवळू नका. नाहीतर गोळे फुटू शकतात. नंतर हलक्या हाताने चमच्याने ढवळत रहा.
*गोळे शिजले की ते कडीवर तरंगायला लागतात.
*मंद आचेवर अजून चार-पाच मिनिटे कधी उकळू द्या.
*आपल्या घरच्या आवडीप्रमाणे साखर व मीठ कमी जास्त प्रमाणात करून घ्या.
*गॅस बंद करा व उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
*आपले कढी गोळे तयार आहेत.
भात...
*तांदूळ...1 वाटी
*पाणी... 3 वाटी
कृती...
*सर्वप्रथम तांदूळ दोन-तीन वेळा चोळून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
*एका स्टीलच्या गंजात तीन वाटी पाणी घालून, वरील धुतलेले तांदूळ घाला .
मंद आचेवर दहा ते बारा मिनिटात भात तयार होतो.
पाणी पूर्ण आटले की गंजावर झाकण ठेवा.
अशा प्रकारे केलेला भात बराच वेळ गरम राहतो व छान मोकळा होतो
तिखट फोडणी
*तेल...2 टेबलस्पून
*लाल तिखट... 1 टिस्पून
• मोहरी... 1/4 टिस्पून
कृती...
*एका स्टिल च्या वाटित एक टीस्पून लाल तिखट घालून घ्या.
*छोट्या लोखंडी कढईत दोन टेबलस्पून तेल तापवून मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर गॅस बंद करा .
*दोन मिनिटांनी हे तेल वाटीतील लाल तिखटावर घाला.
*आपली खमंग लाल तिखट फोडणी तयार आहे.
कसे वाढावे...
*एका ताटात भात वाढून, त्यावर गरम गरम कढी व गोळे वाढावे. व आवडीप्रमाणे फोडणी घालावी .
कढी भातामध्ये व गोळा कुस्करून खावा .
*अतिशय स्वादिष्ट लागतो.
Comments
Post a Comment