#रेणूरसोई
#वरण #फळं #stuffed
भरली वरण फळं
हा एक one dish meal चा प्रकार आहे.
थोडी पुर्व तयारी मात्र करावी लागते ....
आमच्या घरी बरेच वेळा हा प्रकार होतो...
अतिशय चवदार चविष्ट व पुर्ण जेवण होते, सोबतीला आवडत असतील तर कुरकुरीत पापड...
हा पदार्थ मी अगदी घरी जेवायला आलेल्या तरूण भाचे मंडळींसाठी पण केला आहे...व सर्वांना फार आवडतो .
मसाल्यां व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट आणि प्रथिने युक्त... असल्याने पौष्टिक व समतोलआहार आहे....
साहित्य ...
वरणा साठी
* तुरीची डाळ ... 1 वाटी
1 वाटी... 150 मिली
* मीठ ... 1.5 टीस्पून
* हिरव्या मिरच्या ....4 चिरून
* तेल ... 4 टेबलस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
* हिंग पुड ... 1/4 टीस्पून
* कढीपत्त्याची पाने...10..12
* चिंचेचा कोळ... 1 टेबलस्पून
* गुळ ... 1/2 टेबलस्पून
* गोडा मसाला... 1 टिस्पून
फळांसाठी ...
* गव्हाचे पीठ ... 1 वाटी
* तेल ... 3 टीस्पून
* मीठ ... 3/4 टीस्पून
* लाल तिखट ... 1/2 टीस्पून
* हळद ... 1/4 टीस्पून
* जिरे ... 1/4 टीस्पून
* ओवा ... 1/4 टीस्पून
मसाला/ आतील सारण...
*उकडलेले बटाटे, साले काढून किसून...1.5 वाटी
*आले लसूण वाटून...1/4 टिस्पून
*मीठ...1 टिस्पून
*लाल तिखट...1/4 टिस्पून
*किसमिस...20..25
वाढताना ...
* बारीक चिरलेला कांदा ... 1 वाटी
* बारीक चिरून टोमॅटो ... 1/2 वाटी
* बारीक चिरलेली कोथिंबीर ... 1/4 वाटी
* साजूक तुप
कृती ...
* तुरीची डाळ स्वच्छ धुऊन 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. 30 मिनिटानंतर, 3 वाटी पाणी आणि हळद घालून कुकरमध्ये शिजवा. हाय गॅस वर 10 मिनिटे व मंद गॅसवर 10 मिनिटे शिजवा.
* कुकर थंड झाल्यावर वरण छान घोटून एकजीव करावे, आणि 1वाटी पाणी घाला. बाजूला ठेवा.
*आतील सारण साठी चे सर्व साहित्य एकत्र करून छान मिसळून घ्या.
* फळां साठी सर्व साहित्य मिसळा आणि 1/२ वाटी पाणी वापरुन घट्ट कणीक भिजवून ठेवा.10 मिनिटे मुरू द्या.
* 10 मिनिटानंतर, लहान लहान पुरी करा आणि फोटोमध्ये दर्शविलेल्या प्रमाणे , थोडे थोडे सारण भरून, पुरी नीट घट्ट बंद करून गोल आकार द्या.
* गॅसवर एक मोठं भांडे किंवा कढई ठेवा, तेल गरम करा, त्यात मोहरी घाला.
* फोडणी झाल्यावर त्यात हिंग, हिरवी मिरची व कढीपत्त्याची पाने घाला.
* घोटलेले वरण घाला, मीठ, गोडा मसाला, गुळ आणि चिंचेचा कोळ घाला. नीट मिसळा.
* 3 वाटी पाणी घालून गॅसवर उकळी येऊ द्या, जेव्हा ते छान उकळण्यास सुरवात होईल, आधीच तयार केलेले फळं एक एक करून काळजीपूर्वक घालावे.
* गॅस मध्यम आचेवर ठेवा, 5 मिनिटात फळं पृष्ठभागावर तरंगू लागतील.. याचा अर्थ ते शिजले आहेत आणि सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.
* गॅस बंद करा.
* एका सर्व्हिंग Bowl मध्ये 4....5 फळ घाला, वरण घाला, कच्चा कांदा, टोमॅटो , तुप आणि कोथिंबीर घालावी.
टीप ...
1) तुम्ही चिंचेच्या कोळाऐवजी कच्ची कैरी चा किस किंवा कोकम/ आमसुले किंवा लिंबू रस वापरू शकता.
Comments
Post a Comment