बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#रेणूरसोई
कच्च्या केळ्याचे वेफर्स
केळ्याचे वेफर्स फार चवदार व कुरकुरीत होतात.चवीला पण छान असतात.
पण मला बाहेर जे विकत मिळतात ते आणायला आवडत नाही...कारण की एकच तेलात वारंवार तळलेले असते.
व अशा तेलाचे पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही.
आज मी प्रथमच वेफर्स केली व मस्त झाली.
थोडी बनवा... झटपट खा... पटपट संपवा...😄😄
शक्यतो ताजे असतानाच खा.... घरी केली तरी अजिबात तेलकट होत नाही.
साहित्य...
*कच्ची हिरवी गार केळी...3
*हळद...1/2 टिस्पून
*मीठ...1 टिस्पून
*पाणी... कच्ची वेफर्स बुडवण्यासाठी... आवश्यकतेनुसार
*तेल...1.5 वाटी
*खोबरेल तेल...1 टेबलस्पून... ऐच्छिक
कृती...
* केळीचे साल काढून, वेफर्स करून घ्या.
*एका भांड्यात वेफर्स बुडतील एवढे पाणी, हळद व मीठ घालून छान एकत्र करा.
*पाच मिनिटांनी रोळीत उपसुन घ्या.
* लोखंडी कढईत तेल तापवून त्यात खोबरेल तेल घालून गरम झाल्यावर वेफर्स घाला.
सुरूवातीला थोडा फेस येईल, मग कमी होईल.
खोबरेल तेलामुळे येतो, पण चव खुप छान येते.
*प्रथम 2..3 मिनिटे मंद आचेवर व मग मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
*बाहेर काढून, उरलेली पण अशीच तळून घ्या.
* अजिबात तेलकट होत नाही.
*छान लागतात.

Comments
Post a Comment