Skip to main content

Ghadi chi Poli घडी ची पोळी

  #RenuRasoi  #GhadiChiPoli  #घडीचीपोळी #MaharashtrianFood  #MaharashtrianRecipe  #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli.  The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup  *Salt... 1/2 tsp  *Oil ... 2 tbsp  *Water as required ... 1.5 Cup approximately  *Oil or ghee for folding *Wheat flour for  dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead  into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...

उपवासाचा मसाला डोसा... Masala Dosa...Upwas

# रेणुरसोई
 #उपवास / व्रत थाळी
 वरी/भगरी चा डोसे
 बटाट्याची भाजी
 हिरवी चटणी
 # भगरी चा डोसा
 साहित्य ...
 *वरी तांदूळ / भगर ... 1 वाटी
एक वाटी....150 मिली. 
 *साबुदाणा ... 1/2 वाटी
 * मीठ ... 1.5 टीस्पून
 * नारळ तेल ... भाजण्यासाठी
 पद्धत ...
 * भगर आणि साबूदाणा धुवून भरपूर पाण्यात 3 तास भिजत ठेवा.
 * मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.  सामान्य डोसाच्या पिठासारखे पातळ असावे. पिठ एका भांड्यात काढून मीठ घालून कालवून घ्या..
 * लोखंडी तवा 5 मिनिटे गरम करा, २ टीस्पून नारळाचे तेल घालून 2..3 मिनिटे पुन्हा तापवून घ्यावे.  आता तवा डोसा तयार करण्यास तयार आहे.
 * आता तापलेल्या तव्यावर दोन-तीन टेबलस्पून पीठ घालून पातळ डोसा पसरवून घ्या. बाजूने नारळ तेल पसरवून घ्यावे.  कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.  एका बाजू कुरकुरीत झाल्यावर दुसर्‍या बाजूने पण एक मिनिट शिजवावे.
*म‌उ दोसा हवा असल्यास थोडासा जाडसर करून वरून झाकण ठेवून एक मिनिट शिजवावे.
 *बटाट्याची भाजी व  चटणी बरोबर सर्व्ह करा.
 #बटाट्याची भाजी
 * उकडलेले आणि चिरलेले बटाटे ... 4 वाटी
 * भाजलेले शेंगदाणे कूट ... 1/2 वाटी
 * शेंगदाणा तेल ... 2 टेबलस्पून
 * लाल तिखट ... 1 टीस्पून
 * मीठ ... 1 टीस्पून
 * जिरे ... 1/2 टीस्पून
 * कोथिंबीर चिरलेली ... 1 टेस्पून
 कृती ...
 * एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे घालून, तडतडल्यावर नंतर त्यात लाल तिखट व चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्या.
 *छान एकत्र करावे, भाजलेले शेंगदाणे कूट,  मीठ घाला.
 पुन्हा एकदा एकत्र करावे.
 *मध्यम आचेवर 3..4 मिनिटे परतावे.
 * गॅस बंद करा, चिरलेला कोथिंबीर घाला.
 * डोसाबरोबर सर्व्ह करा.
 * आपण फक्त ही भाजी व दही पण फराळाचे म्हणुन खाऊ शकता.
 # हिरवी चटणी
 * नारळाचे काप/ तुकडे ‌.. ताजे किंवा सुके ... 1/2 वाटी
 *  भाजलेले शेंगदाणे.... 1 टेस्पून
 * हिरव्या मिरच्या ... 5
 * चिरलेली कोथिंबीर ... 1/2 वाटी
 * लिंबाचा रस ... 3 टीस्पून
 * मीठ ... 1/2 टीस्पून
 कृती ...
 * पाणी न घालता मिक्सरमधून  बारीक वाटून घ्यावे.
 * १/२ वाटी पाणी घाला व परत एकदा बारीक वाटून घ्यावे.
 * डोसाबरोबर सर्व्ह करा.

Comments

Post a Comment