लाल मिरची ची चटणी
#रेणूरसोई
#रेणूरसोई
लाल मिरची ची चटणी
बाजारात रसरशीत लाल भडक रंगाच्या ओल्या मिरच्या मिळत आहेत... त्या पाहिल्या बरोबर घ्यायचा मोह होतोच ☺️
आज पाहू या एक वेगळ्याच प्रकारची चटणी... अतिशय चवदार, चटकदार पण तिखट फार नाही ....पण सगळ्यांना आवडेल अशी
साहित्य...
*लाल ओल्या मिरच्या धुवुन, व मोठे मोठे तुकडे करून ... 1 वाटी
1 वाटी... 150 मिली
*लसूण पाकळ्या सोलून... 5..6
*सुके खोबरे किस... 3 टेबलस्पून
*भाजलेले शेंगदाणे.... 3 टेबलस्पून
*मीठ... 1 टिस्पून
*जीरे... 1/2 टिस्पून
*तेल... 2 टेबलस्पून
*लिंबू रस... 1 टेबलस्पून
*मोहरी... 1/4 टिस्पून
*हिंग पुड... 1/4 टिस्पून
कृती...
*लाल मिरच्या मीठ जिरे व लिंबू रस मिक्सर मधून वाटून घ्या.
*नंतर पुन्हा त्यात खोबरे किस व शेंगदाणे घालून जाडसर वाटून घ्या.
*नंतर एका कढईत येईल तेल तापवून मोहरी घालून ती तडतडल्यावर हिंगपूड व वाटलेले मिरचीचे मिश्रण घालून मंद आचेवर मोकळी होईपर्यंत परता.
*आपली चटकदार मिरची ची चटणी तयार आहे.
*दोन दिवस बाहेर चांगली राहते, वाटल्यास फ्रीजमध्ये ठेवावे.
*तुम्ही लसूण न घालता पण करू शकता.
Mast
ReplyDelete