#RenuRasoi
#Roti #soft #Gujarat
Bepad Roti
Gujarati Bepad Roti is a traditional double-layered roti that is soft, thin and delicious.
They taste delicious with AamRas, ghee and jaggery, Vegetables, Dal, Kadhi, Pickle etc.
They are very tasty, and can be prepared for special occasions.
Ingredients
1 Cup... 150 ml
* Whole wheat flour... 2 Cups
* Salt... 1/2 tsp
* Oil or ghee (for dough)... 1 tbspn
* Warm water... 1 Cup (as needed)
* Ghee or Oil (for layering and roasting) ... 2-3 tbspn
*Dry wheat flour for dusting.
Method
*Mix the flour and salt. Add oil and gradually add warm water to make a soft, smooth dough.
*Cover and let the dough rest for 20–30 minutes.
*Divide into 10 - 12 equal balls.
*Roll two balls into small rotis (about 3-4 inches).
*Spread a thin layer of ghee on one roti and dust lightly with dry flour.
Place the second roti on top and press the edges gently.
*Roll both together into a 7–8 inch roti.
*Cook on a hot tawa. When bubbles appear, flip it and apply a little ghee.
*Cook both sides until golden spots appear.
*Remove from the tawa and gently separate the two layers while still warm.
*You can use blunt side of a knife or spoon to seperate the Roti.
Serve hot with: AamRas, Jaggery and ghee, Vegetables, Dal, Mango Pickle, Fresh Curd etc
Tip: Resting the dough and using a light dusting of flour between the layers helps the roti to separate easily after cooking.
#रेणूरसोई
#पोळी #मऊ #गुजरात
बेपड रोटी
बेपड रोटी या गुजरात मध्ये विशेष करून केल्या जातात.
ही रोटी अतिशय मउसुत,नरम,हलकी आणि खुसखुशीत पोळी चा प्रकार आहे.
ही रोटी आमरस, भाजी, डाळ, कढी, दही किंवा लोणच्यासोबत अतिशय स्वादिष्ट लागते.
या रोटी तुम्ही एखाद्या विशेष समारंभासाठी सुद्धा करू शकता.
साहित्य
*गव्हाचे पीठ – २ कप
*मीठ – ½ टीस्पून
*तेल किंवा तूप – १ टेबलस्पून (पीठासाठी)
*कोमट पाणी – आवश्यकतेनुसार (सुमारे 1 कप)
*तूप किंवा तेल – २–३ टेबलस्पून (पोळी वर लावण्यासाठी व भाजण्यासाठी)
*लाटण्यासाठी सुके पीठ
कृती
*गव्हाच्या पिठात मीठ आणि तेल घालून मिसळा.
आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या.
*पीठ झाकून २०–३० मिनिटे मुरू द्या.
*पिठाचे १०- १२ समान गोळे करा.
*दोन गोळ्यांच्या लहान पोळ्या लाटा. (अंदाजे ३-४ इंच)
*एका पोळीवर थोडेसे तेल किंवा तूप लावून त्यावर थोडे सुके पीठ भुरभुरा.
*त्यावर दुसरी पोळी ठेवून कडा हलक्या हाताने दाबा.
*आता दोन्ही पोळ्या एकत्र ७–८ इंच व्यासाची पोळी लाटा.
*गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजताना तूप किंवा तेल लावा.
*रोटी भाजून झाल्यावर गरम असतानाच हलक्या हाताने दोन थर वेगळे करा.
*रोटी वेगळ्या करण्यासाठी तुम्ही चाकू ची धार नसलेली बाजू किंवा चमच्याच्या दांडी पण वापरू शकता.
*वाढण्याची पद्धत
गरमागरम बेपड रोटी आमरस, भाजी, डाळ, कढी, दही, लोणचे किंवा तूप-गुळासोबत वाढा.
टीप:
*पीठ व्यवस्थित मुरू द्या आणि दोन पोळ्यांच्या मध्ये तूप किं
वा तेल लावून वर सुके पीठ लावल्यास रोटीचे थर सहज वेगळे होतात.

Comments
Post a Comment