Skip to main content

Podi Idli in Marathi

 


#रेणुरसोई
#पोडी #इडली
हिला पोडी....मल्गा पोडी... किंवा गन पावडर असे म्हणतात....
फार तिखट असल्यामुळे गन पावडर म्हणतात...
ही चटणी तेलात मिसळून अर्धा तास मुरल्यावर इडली, डोसा ला लावून अप्रतिम लागते 😋😋😋
विशेषत: जेव्हा आपण घाईत असाल तेंव्हा  लंच बॉक्समध्ये किंवा प्रवासातही घेऊन जाण्यासाठी मस्त ... खूप चवदार आणि खायला सोप्पी आहे.
कोणत्याही सांबार किंवा चटणीची गरज नाही.
ही रेसिपी मी माझ्या तमिळ मैत्रीणीकडून शिकली आहे...

साहित्य ... 1 वाटी...200 मिली
*उडीद डाळ ... 1/2 वाटी
* हरबरा/ चणा डाळ .... 1/2 वाटी
* तीळ ... 1/4 वाटी
* सुक्या लाल मिरच्या ... 10..12
किंवा
*लाल तिखट ... 3 टीस्पून
*हिंग पावडर ... 1/4 टीस्पून
*मीठ ... 1/2 टीस्पून
पद्धत ...
* उडीद डाळ, चणा डाळ आणि तीळ वेग  वेगळे मंद आचेवर भाजून घ्या.
* जर लाल मिरची वापरत असेल तर तीपण 2 मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.
* जेव्हा सर्व छान  गार होईल, तेंव्हा मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या. या करता मिक्सर काही सेकंद सुरू करून वाटा....मग बंद करा...परत सुरू करा... असे केल्याने एकसारखे रवाळ टेक्स्चर मिळते नाहीतर थोडी बारीक थोडी जाड अशी चटणी होईल.
* या चटणी ला तेलात  कमीतकमी 30 मिनिटे कालवुन छान मुरल्यावर व इडली किंवा दोसा ला भरपूर प्रमाणात लावून डब्यात न्या. 
जेवढी चटणी मुरलेली तितकी इडली किंवा दोसा चवदार लागेल.
* या पोडीला सढळ हाताने वापरा.
इडली
इडली हा मुख्यतः दक्षिण भारतातील पदार्थ आहे. पण आता आपण सगळेच जण आवडीने खाता.
इडली ही उत्तम जमली तरी खायला मजा येते, पीठ खूप आंबट पण नको, पण बेचव पण नको.
इडली घट्ट नको, म‌उ लुसलुशीत जाळीदार हवी...
तेंव्हा आज बघु या स्वादिष्ट इडली कशी करायची..

सांबार ची रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल...
https://www.renurasoi.com/2018/12/sambar.html?m=1
साहित्य...
*तांदूळ... तीन वाटी
*उडीद डाळ... एक वाटी
*पातळ पोहे... एक वाटी
*मेथी ...1 टीस्पून 
*मीठ ...चार चमचे
*तेल ...5 टी स्पून
इडली स्टँडला लावण्याकरता
कृती ...
*प्रथम तांदूळ व उडीद डाळ स्वच्छ धुऊन घ्या व  पाच ते सहा तासाकरता भिजत घाला. मेथी दाणे पण त्यातच घाला.
*मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या.
*हे मिश्रण सात ते आठ तास आंबायला ठेवा. *मिश्रण हे भज्याच्या पिठासारखे घट्ट हवे चमच्याने ओतता येईल इतपत पातळ असावे.
*पीठ आंबल्यावर त्याच्यात चार टीस्पून मीठ घालून मिश्रण छान फेटून घ्यावे.
*इडली पात्रात पाणी घालून  गरम करायला ठेवून द्यावे, इडलीपात्र नसेल तर आपण साध्या कुकरमध्येही इडली करु शकता फक्त प्रेशर म्हणजेच शिट्टी लाऊ नये.
*इडली स्टँडला तेल लावून प्रत्येक इडलीच्या साच्यात एक टेबल स्पून पीठ घालावे. 

*अशाप्रकारे इडली स्टँड कुकरमध्ये मध्यम आचेवर दहा मिनिटे वाफवून घ्यावे.
*दहा मिनिटानंतर झाकण बाजूला काढून सुरी घालून तपासून पाहावे ,सुरी कोरडी बाहेर आली म्हणजे आपल्या इडल्या झाल्या आहेत .
*पात्रातून साचा बाहेर काढून ,थोडे गार झाल्यावर सुरीच्या सहाय्याने  इडली काढून घ्या.
*मऊ लुसलुशीत इडली गरमा गरम सांबार व चटणी सोबत सर्व्ह करा.
*इडली गरजेपेक्षा जास्त वेळ जर वाफवली तर दगडासारख्या घट्ट होतात.
*उरलेल्या पिठाच्या पण अशाप्रकारे इडली करून घ्या.


Comments

Popular posts from this blog

Dhokla

#Dhokla
#Quick  #Healthy #Yummy
#RenuRasoi
Dhokla is a snack item not only favourite of Gujarat, but throughout India.
Here is a quick version to satisfy your taste buds as well as to welcome your guests.
Ingrediants. ..
•Besan /Chickpea flour 1 Cup 1 Cup...200 ml
*Semolina...1 tablespoon... Optional
•Citric  Acid Crystals....1/2 tsp.
 I have used Eagle Brand  .
•Sugar  ...2 tsp
•Salt ..1/2 tsp
•Oil 2 tsp
•Eno/Fruit Salt 1/2 tsp
•Water. ...1 Cup
  For Tempering...
•Oil 1 tbspn
•Mustard seeds 1/2 tsp
•Asafoetida Powder...a big pinch
•Green Chillies ...6
•Grated Coconut and Coriander for Garnish
Method...
•Mix Chickpea flour/Besan, Semolina ... Citric Acid Crystals.... Sugar..n Salt properly.
•Slowly by adding water prepare the batter....add 2 tsp Oil... Mix.
•Preheat the big pan with a water on the  gas.
•Take another pan preferably Aluminium one, and 6" diameter.
•Grease it with Oil on all sides and bottom.
•Now in  the  Dhokla batter add Eno/ Fruit Salt...mix it quickly. ..it wi…

Soft Dosa

#रेणूरसोई
#झटपट #दोसा
सकाळच्या घाईच्या वेळेत, स्वयंपाक व नाश्ता हे दोन्ही आटपून 9 वाजता ऑफिससाठी घराबाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरत😊.
त्यात माझा दिवसाची सुरुवात होणारा नाश्ता हा पोषक असावा ह्या गोष्टीवर भर असतो.
मग अशावेळेस खुप युक्ती लढवाव्या लागतात.
आज त्यातीलच एक चवदार प्रकार...
खमंग दोसा...बिना चटणीचा तरी चवदार...
लोखंडी तवा वापरून हि पटकन होणारा...
झटपट दोसा...
साहित्य...
जाड तांदुळ..3 वाटी
उडीद डाळ...1 वाटी
मेथीदाणा...1 tsp
मीठ.... 3.5 tsp
जाड पण तिखट हिरवी मिरची ..4,5
खोबरेल तेल...1/2 वाटी
कृती....
तांदुळ, डाळ स्वछ धुवून व मेथीदाणे घालुन 4..5 तास भिजवा.
मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या, फार पातळ वाटु नका.
रात्रभर आंबवुन घ्या.
सकाळी त्यात मीठ घालून, मिक्स करा, गरज वाटली तर 1 वाटी पाणी घालून पातळ करा.
गॅसवर स्वच्छ घासलेला लोखंडी तवा 5 मिनिटे तापवत ठेवा.
गॅस कमी करून , त्यावर 2 tsp तेल पसरवून अजून 3 मिनिटे तापवा.
आपला तवा दोसे करायला सिद्ध झाला.
तवा मंद गॅसवर करा, 2..3 थेंब तेल घालून पसरवा, 2 मोठे चमचे भरून पीठ घाला, झटपट गोल पसरवा.
खुप पातळ नको, जाडसर ठेवा.
त्यावर मिरची चे तुकडे आ…

Multigrain Dosa

#RenuRasoi
Multigrain Dosa
Very crispy n paper thin Dosa when served with  Chutney makes a complete Meal 👍😋
With the same batter you can prepare soft and fluffy Dosa too...
Full of Carbohydrates n Proteins.
Ingredients...
*Raw Rice...1 Cup
*Udad/ Split BlackGram dal...1/4 Cup
*Cheakpea / Chana Dal...1/4 Cup *Arhar/Toor dal... 1/4 Cup
*Moong Dal... 1/4  Cup
*Fenugreek seeds...1/2 tsp
*Salt... 2 tsp
*Coconut Oil... for Roasting
Method...
*Wash and soak the Rice, Dal and Fenugreek seeds for 5..6 hours.
*Grind to a smooth paste.
*Let it ferment for 8 hours.
*In the morning add Salt mix thoroughly, add little water if necessary.
*Dry heat the Iron Tawa for five minutes, spread one teaspoon Oil n let it heat for 2..3 minutes. Now Tawa is ready for cooking.
*Spread 1 tablespoon batter evenly, it should be thin, drizzle Oil from all the sides, let it crispy by one side
 flip and cook another side.
*In this way prepare  all the Dosa
*Serve  hot with  Potato Masala, Sambhar n Coconut Chutney…