#रेणुरसोई
#गोळा#भात
गोळाभात हा अतिशय चवदार चविष्ट प्रकार आहे.
हा भात व सोबत कढी किंवा चिंचेचे खमंग सारं....दुसरे काही नको... सगळे जण जेवुन तृप्त होतात.
गोळा भात फार अप्रतिम लागतो...
संपूर्ण संतुलित आहार ... कार्बोहायड्रेटस, प्रोटीन आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण ...
खुप मस्त व पोटभरीचा 😋😋😋😋
साहित्य ...
गोळ्या साठी ...
* बेसन किंवा चणाडाळीचे जाडसर/ रवाळ पीठ ... 1 वाटी 200मिली
* तेल ... 4 टीस्पून
* मीठ ... 1/2 टीस्पून
* लाल तिखट ... 1 टीस्पून
* हळद ... 1/4 टीस्पून
* आले वाटून... 1/2 टीस्पून
* लसूण वाटून... 1/2 टीस्पून.... ऐच्छिक
* हिंग पुड...1/4 टीस्पून
* पाणी ... 1 वाटी... 200 मि.ली.
कृती...
* बेसन, व सर्व मसाले एकत्र करून हळूहळू पाणी घालून गुठळी होऊ न देता भिजवून घ्या.
* हे पीठ 30 मिनिटे मुरू द्या.
* मग त्याचे छोटे गोल गोळे करून मुठीने हलके दाबुन मुठीया करा.
*एका मोठ्या कढईत पाणी गरम करून ठेव त्याच्यावर एक रोळी ठेवा, व हे मुठे/ गोळा पंधरा मिनिटे वाफवून घ्या. गॅस बंद करा.
भात ...
साहित्य ...
*तांदुळ... 1 वाटी ... २०० मिली
*तेल... 2 टेबलस्पून
*मोहरी...1/4 टिस्पून
*हळद...1/4 टिस्पून
*मीठ... 1 टिस्पून
* भात शिजवण्यासाठी पाणी ... 3 वाटी
कृती...
* स्वच्छ पाण्याने दोनदा तांदूळ धुवा.
* मग एका जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवून मोहरी घालून फोडणी करा.
नंतर हळद व तांदूळ घालून दोन मिनिटे तांदूळ परतून घ्या.
*तीन वाटी पाणी व मीठ घालून छान ढवळा व भात शिजवून घ्या. गॅस बंद करावा.
*झाकण ठेवून भात मुरू द्या.
* फोडणीसाठी ...
* तेल ... 4 टेबलस्पून
* मोहरी ...1/2 टीस्पून
* हिंग पुड ... 1/4 टीस्पून
* सुक्या लाल मिरच्या ... 4 ...तोडुन घ्या... ऐच्छिक
कृती ...
* लोखंडी कढई किंवा तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला, तडतडल्यावर
हिंग आणि तुकडे लाल मिरची चे तुकडे घाला.
* गॅस बंद करा.
चिंचेचे सार
* चिंच ... लिंबाएवढी
* गुळ ... चिंचेच्या अर्धा
* तेल ... 2 टेबलस्पून
* लाल तिखट ... 1/2 टीस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
* कढीपत्ता ... 8
* हळद ... 1/4 टीस्पून
* हिंग पावडर ... 1/4 टीस्पून
* मोहरी ... एक चिमूटभर
* चिरलेली कोथिंबीर ... 1 टेबलस्पून
पद्धत ...
* चिंच स्वच्छ करा, सर्व धागे व बिया काढा. एका वाटी पाण्यात 30 मिनिटे भिजवा.
* 30 मिनिटांनी व्यवस्थित कुस्करून कोळ करून घ्या.
* आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला, फोडणी झाल्यावर त्यात हिंग, हळद आणि कढीपत्ता घाला.
* काही सेकंद परता. लाल तिखट आणि चिंचेचा कोळ घाला.
* नीट परतून घ्या, त्यात तीन कप पाणी, गूळ आणि मीठ घाला.
* मध्यम आचेवर पाच मिनिटे उकळा.
* पाच मिनिटांनंतर गॅस बंद करा. चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला.
सर्व्हिंगसाठी ...
एका बशीत भात वाढा, त्यावर 4 गोळे कुस्करून घाला, एक चमचा खमंग फोडणी घाला. मस्त पैकी कालवून चिंचेच्या सारा बरोबर खा. झक्कास लागते.
Wonderful 😋😋
ReplyDelete