#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#रेणूरसोई
कडव्या वालाचे बिरडे
अतिशय स्वादिष्ट लागणारी ही कडव्या वालाची रसदार उसळ थोडी निगुतीने करावी लागते...
पुर्व तयारी केली तर हमखास उत्तम 👌👌 बनते.
गरमागरम भाताबरोबर किंवा पोळी बरोबर अतिशय अप्रतिम लागते 😋😋😋
ही रेसिपी माझी मैत्रीण सानिका शिलोत्री ह्यांची आहे...☺️
साहित्य...
*कडवे वाल...1 वाटी
वाल स्वच्छ धुऊन, 3 वाटी पाण्यात 10 तास भिजत घाला. मग पाणी निथळून, कोरड्या कपड्यात बांधून ठेवा...मी स्प्राउट मेकर मध्ये केले. व 24 तासांत उत्तम मोड येतात. मग 2..3 वाटी पाणी कोमट करून त्यात हे वाल 30 मिनिटे बुडवून ठेवावे. त्यामुळे सालं पटकन निघतात. सगळ्या वालांना सोलून घ्या. अंदाजे दिड वाटी वाल होतात.
*वाल मुरवुन ठेवायला मसाला...
3 लसूण पाकळ्या, 1/2 टिस्पून चिरून आलं व 1/2 टिस्पून जीरे पाणी न घालता कुटुन, 1/4 टिस्पून हळद, 1 टिस्पून तिखट , 1 टिस्पून धनेपूड.
* फोडणीसाठी वाटण मसाला...
ओले खोबरे कीस..1/2 वाटी, हिरवी मिरची चिरून...3, लसूण पाकळ्या 3, आले चिरून 1/2 टिस्पून, जीरे...1/2 टिस्पून
हे सगळे पदार्थ एकत्र करून पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे.
*तेल...5 टेबलस्पून
*कांदा चिरून...1
*मीठ...1 टिस्पून
*तिखट...1 टिस्पून
*धनेपूड...1 टिस्पून
*हळद...1/4 टिस्पून
*मोहरी...1/4 टिस्पून
*कढिपत्ता...8, पानं
*गुळ...2 टिस्पून
*आमसुले...5/6
कृती...
*मोड आलेल्या वालांना, मुरवण्यासाठी दिलेला मसाला हलक्या हाताने चोळुन लावा. 30 मिनिटे मुरू द्या.
* एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी घालून, तडतडल्यावर हळद व कांदा घालून मउ
होईपर्यंत परतून घ्या. कढीपत्ता घालावा.
*मग तिखट व धनेपूड घालून, वाटलेला मसाला घालून छान एकत्र करून मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतावे.
* मग मसाल्यात मुरलेले वाल घालून पुन्हा एकदा छान 3..4 मिनिटे परतून घ्यावे.
* मग चार वाट्या गरम पाणी घालून, झाकण ठेवून 10 मिनिटे शिजू द्यावे.
*झाकण काढून त्यात मीठ, आमसुले व गुळ घालून छान एकत्र करून, परत 3..4 मिनिटे शिजू द्यावे.
* गॅस बंद करून, कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
*गरमागरम भाताबरोबर किंवा पोळी बरोबर छान लागते.
टिप...आमसुला ऐवजी चिंचेचा कोळ वापरून पण छान होते.

Comments
Post a Comment