#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Methamba
Methamba
Here we are using Methi & Mango....hence the name Methamba.
Whenever Raw Mango enters the market Methamba is prepared first in our house...
This is so yummy and tasty that I like to have it till Raw Mangoes are available in the market....
Goes very well with Dal Rice or Simple Ghee Roti .
Ingredients...
*Raw Mango 3...
*Fenugreek Seeds...1/4 tsp
*Asafoetida Powder... 1/4 tsp.
*Turmeric Powder... 1/4 tsp
*Red Chilly Powder... 1 tsp
*Salt.... 1/2 tsp
*Oil... 1 tablespoon
*Jaggery half the quantity of Raw Mango chunks.
Method...
*Peel n dice the Raw Mango... chopp them into small pieces...
*Heat the Oil ....add Fenugreek, Mustard n Cumin Seeds...when it splutters add Asafoetida Powder..add chopped Raw Mango...mix properly.
*Add Turmeric and Red Chilli Powder...mix..add Salt, Jaggery n 2 table spoon water...Let it cook till Jaggery dissolves n Mango becomes tender...stir it occasionally...
*We use the Raw Mango seeds also...they are tasty n very juicy ...
*Done...
*It remains 3..4 days outside fridge or if kept in fridge for a week also.
But it is so tangy it finishes quickly.
Enjoyy...
*रेणूरसोई
उन्हाळ्याची चाहूल लागली व बाजारात हिरव्यागार कैरी आल्या की आमच्याकडे सर्वप्रथम बनतो तो मेथांबा...😋😋😋
मेथी आणि कच्ची कैरी म्हणजे आंबा यांचे हे रसायन अफलातून लागते...
मेथीचा कडवटपणा... कैरीचा आंबटपणा... मधुर गुळ व खमंग असा हिंगाचा स्वाद....
अहाहा इतके सुंदर लागते की आत्तासुध्दा तोंडात झरे सुटले आहेत....
मेथांबा करताना जर एक दोन कैरी च्या कोयी घातल्या तर मस्तच रसदार होतात...व कोय घेण्यासाठी लुटुपुटु चे भांडण होते कारण कोय सगळ्यांनाच आवडते...जेवण संपतच नाही मग तर...😃😃😃
फोडणी चे वरण... भात... तुप व मेथांबा... जोडीला कच्चा कांदा... झक्कास जेवण होते.
मेथांबा...तुप व पोळी पण मस्त लागते
पाहू या मेथांबा कसा करायचा ते...
साहित्य....
*कैरी....3 साले काढून व चिरून
*गुळ चिरून... कैरीच्या फोडींच्या अर्धा
*तेल... एक टेबल स्पून
*तिखट... एक टी स्पून
*मीठ ...अर्धा टिस्पून
*मेथीदाणे...1/4 टिस्पून
*हिंग पूड...1/4 टिस्पून
*हळद...1/4 टिस्पून
कृती....
*एका स्टीलच्या कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी,जिरे व मेथी दाणे घालून खमंग तडतडल्यावर त्यात हिंग व कैरी च्या फोडी घालून एकत्र करा.
* हळद ,तिखट घालून एकत्र करावे, लगेच मीठ व गुळ घालून... दोन टेबलस्पून पाणी घालून मध्यम आचेवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्या.
*अधुन मधुन हलवत रहा.
*मस्त आंबट गोड मेथांबा तयार.
*ह्या मध्ये कैरी चिरून उरलेल्या कोयी पण घाला... छान रसदार होतात...
*दोन तीन दिवस टिकतो...फ्रिज मध्ये ठेवला तर अजून जास्त दिवस टिकतो.... अर्थात शिल्लक राहिला तर...😄😄
उन्हाळ्यात मेथांबा असला कि पटापट जेवण जाते. ऑफिस मध्ये डब्यात न्यायला मज्जा यायची
ReplyDeleteThanks 🙏
Delete