#रेणूरसोई
फोडणीचा भात
हा आमच्याकडील एक अत्यंत आवडता पदार्थ आहे ...पण त्यासाठी भात हा आदल्या दिवशी रात्री शिजवून ठेवलेला च हवा.
ताजा शिजवलेला भात फोडणी दिला तर तो तितका चांगला लागत नाही...
भरपूर मटर ,हिरवी मिरची घालून केलेला भात अफलातून लागतो...
साहित्य...
*शिजवलेला भात... तीन वाट्या
*मटार दाणे... एक वाटी
*तेल ...एक टेबलस्पून
*हिरव्या मिरच्या... चार
*मीठ... 1 टिस्पून
*हळद ...चिमुटभर
*लिंबू रस... 1टिस्पून
*साखर... चिमुटभर
*मोहरी व जिरे... 1/4 टिस्पून प्रत्येकी
कृती...
*भात हाताने मोकळा करून घ्यावा.. एक वाटी तांदळाचा भात शिजवला की अंदाजे तीन वाट्या भात तयार होतो.
*कढईत तेल तापवून मोहरी ...जिरे ची फोडणी करावी. त्यात मिरच्यांचे तुकडे, हिंग ,हळद व मटार दाणे घालून परतावे.
*त्यात लगेच मीठ, साखर व भात घालून झाकण ठेवून तीन-चार मिनिटे वाफ येऊ द्यावी. *नंतर झाकण बाजूला काढून, छान हलवा. वाफ दिल्याने भात छान मोकळा होतो.
*नंतर त्यात लिंबू रस व कोथिंबीर घालून गरम गरम फोडणीचा भात सर्व्ह करा.
टीप... कधी कधी बदल म्हणून स्वीट कॉर्न, मटर लाल ताजी मिरची घालून करा ....हा प्रकार पण मस्त लागतो.

Comments
Post a Comment