#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
पनीर पराठा
#रेणूरसोई
#पनीर #पराठा
पनीर पराठा
पनीर पराठा खूप पौष्टिक होतो व झटपट करता येतो... छान लागतो 😋😋😋
पनीर असल्यामुळे भरपूर प्रोटीन व साजूक तुपाचा शेकल्यामुळे खमंग खुसखुशीत होतो. आपण पनीर घरी केलेले पण वापरू शकता किंवा विकतचे सुद्धा.
साहित्य...
वरील आवरणासाठी
*गव्हाचे पीठ... दोन वाटी
*तेल.... 6 टीस्पून
*मीठ...1/2 टीस्पून
*पाणी...1 वाटी
आतील सारण...
*किसलेले पनीर...2 वाटी
*कोथिंबीर चिरून...2 टेबलस्पून
*हिरवी मिरची चिरून...2
*आले किसलेले...1/2 टीस्पून
*लिंबू रस...1 टीस्पून
*मीठ...1/2 टीस्पून
*तिखट...1 टीस्पून
*साजूक तुप... पराठे शेकण्यासाठी
कृती...
*गव्हाचे पीठ, तेल व मीठ छान एकत्र करून, हळूहळू पाणी घालून कणीक भिजवून घ्या.
मला एक वाटी पाण्यातील एक टेबलस्पून पाणी कमी लागले.
*भिजवलेली कणीक झाकण ठेवून 30 मिनिटे मुरू द्या.
*सारणासाठी चे सर्व साहित्य एकत्र करून छान गोळा करून घ्या.
*भिजवलेल्या कणकेचे व सारणाचे सारखे गोळे करून घ्यावेत. माझे सात गोळे झाले.
*प्रथम पोळपाटावर कणीक पुरी एवढी लाटुन त्यात पनीर चे सारण भरावे. चारी बाजूंनी कणीक आवरण घालून हलक्या हाताने पराठा वाटावा.
*गरम लोखंडी तव्यावर मध्यम आचेवर कोरडा भाजून मग साजूक तुपात खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्या.
*पराठे दही व लोणच्या सोबत सर्व्ह करा.
*मला तर नुसता पराठा खायला आवडतो.

Comments
Post a Comment