#RenuRasoi #Aluchi Vadi #Steamed #Colocasia #Leaf #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot. Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi. It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...
#रेणुरसोई
#वरण #फळ
हा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे... पूर्ण जेवणाला पर्याय...
फार चवदार चविष्ट लागतात...😋😋😋
गुजराथी दाल ढोकळी प्रमाणेच ...
खुप चवदार आणि पौष्टिक ...
मसाल्यां व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट आणि प्रथिने युक्त... असल्याने सगळ्यांना आवडतो...
साहित्य ...
वरणा साठी
* तुरीची डाळ ... 1 वाटी
* मीठ ... 1.5 टीस्पून
* हिरव्या मिरच्या ....4 चिरून
* तेल ... 4 टेबलस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
* हिंग पावडर ... 1/4 टीस्पून
* लिंबाचा रस ... 4 टीस्पून
* साखर ... 3 टीस्पून
फालसाठी ...
* गव्हाचे पीठ ... 1 वाटी
* तेल ... 3 टीस्पून
* मीठ ... 3/4 टीस्पून
* लाल तिखट ... 1/2 टीस्पून
* हळद ... 1/4 टीस्पून
* जिरे ... 1/4 टीस्पून
* ओवा ... 1/4 टीस्पून
वाढताना ...
* बारीक चिरलेला कांदा ... 1 वाटी
* बारीक चिरून टोमॅटो ... 1/2 वाटी
* बारीक चिरलेली कोथिंबीर ... 1/4 वाटी
पद्धत ...
* तुरीची डाळ स्वच्छ धुऊन 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. 30 मिनिटानंतर, 3 वाटी पाणी आणि हळद घालून शिजवा. हाय गॅस वर 10 मिनिटे व मंद गॅसवर 10 मिनिटे शिजवा.
* कुकर थंड झाल्यावर वरण छान घोटून एकजीव करावे, आणि 1वाटी पाणी घाला. बाजूला ठेवा.
* फळां साठी सर्व साहित्य मिसळा आणि 1/२ वाटी पाणी वापरुन घट्ट कणीक भिजवून ठेवा.10 मिनिटे मुरू द्या.
* 10 मिनिटानंतर, लहान लहान पुरी करा आणि फोटोमध्ये दर्शविलेल्या प्रमाणे आकार द्या.
* गॅसवर एक मोठं भांडे किंवा कढई ठेवा, तेल गरम करा, त्यात मोहरी घाला.
* फोडणी झाल्यावर त्यात हिंग आणि हिरवी मिरची घालावी.
* घोटलेले वरण घाला, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. नीट मिसळा.
* 3 वाटी पाणी घालून गॅसवर उकळी येऊ द्या, जेव्हा ते छान उकळण्यास सुरवात होईल, आधीच तयार केलेले फळं एक एक करून काळजीपूर्वक घालावे.
* गॅस मध्यम आचेवर ठेवा, 5 मिनिटात फळं पृष्ठभागावर तरंगू लागतील.. याचा अर्थ ते शिजले आहेत आणि सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.
* गॅस बंद करा.
* एका सर्व्हिंग Bowl मध्ये 4....5 फळ घाला, वरण घाला, कच्चा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालावी.
टीप ...
1) तुम्ही लिंबूच्या रसाऐवजी कच्ची कैरी चा किस किंवा कोकम/ आमसुले किंवा चिंचेचा कोळ वापरू शकता.
2) साखरेऐवजी गूळ घालू शकता.
3) कढीपत्ता वेगवेगळ्या चवसाठी वापरा.
4) एक चमचा घरी केलेले तूप घालून सर्व्ह करा.

Thanks 🙏
ReplyDeleteताई आज बनवली फळे, छान झाली,lockdown रेसिपी पाठवा take care
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏
Deleteफोटो असल्यास शेअर करा प्लीज