#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
In English
This simple n Yummy veg recipe is Quick to cook. Use of Sour Curd makes it Tangy.
All will relish it with Roti or Dal Rice
Ingredients...
•Potatoes 250 Grams
•Onion 1 Big
•Sour Curd 1 Cup
•Water 1 Cup
•Oil 1 tablespoon
•Mustard Seeds 1/4 tsp
•Turmeric Powder 1/4 tsp
•Red Chilly Powder 3/4 tsp
•Salt 3/4 tsp
•Coriander Chopped 1 tbspn
Method...
•Boil the Potatotes, let it cool n dice it.
•Chopp the Onion.
•Beat the Curd, keep it aside.
•Heat the Oil in a pan, add Mustard seeds, after it splutters add Turmeric Powder n Onion.
•Saute it for 3 minutes, add Red Chilly Powder and diced Potatoes.
•Saute it on medium flame for 3..4 minutes.
•Add Salt, Curd n Water, mix properly.
•Let it simmer for 5 minutes.
•Switch off the gas.
•Garnish with Coriander.
Serve hot with Roti or Dal Rice.
Enjoyy...
In Marathi
दही बटाटे रस्सा
पावसाळा सुरू आहे, अशा वेळी चटपटीत व गरमा गरम रस्सेदार भाजी असेल तर जेवणाची लज्जत अजूनच वाढते.
आज अशीच झटपट होणारी भाजी पाहू या.
साहित्य...
•बटाटे 3 मध्यम किंवा 250 ग्राम
•कांदा 1 मध्यम
•आंबट दही 1 वाटी
•पाणी 1 वाटी
•तेल 1 tbspn
•मोहरी 1/4 tsp
•हळद 1/4 tsp
•तिखट 3/4 tsp
•मीठ 3/4 tsp
•कोथिंबीर 1 tbspn
कृती..
•बटाटे उकडून घ्या, गार झाल्यावर सोलून तुकडे करा.
•कांदा चिरून घ्या, दही फेटून घ्या.
•कढईत तेल तापवा, मोहरी घालून तडतडल्यावर हळद व चिरलेला कांदा घाला.
•2 मिनिटे परतून मग तिखट व बटाट्याच्या फोडी घालून 5 मिनिटे परता.
•फेटलेले दही, मीठ व पाणी घालून मिक्स करा.
•पाच मिनिटे मध्यम आचेवर उकळा.
•गॅस बंद करा, कोथिंबीर घाला.
•गरमा गरम भाजी पोळी किंवा वरण भातासोबत वाढा.
खुप छान लागते.
Comments
Post a Comment