Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

Aluchi Vadi अळू वडी

#RenuRasoi  #Aluchi Vadi  #Steamed  #Colocasia #Leaf  #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot.  Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi.  It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि ...