Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

Ukadiche Modak

  #रेणूरसोई  #मोदक #उकडीचे  उकडीचे मोदक  विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी  *पाणी... 1 वाटी  *मीठ... 1/4 टिस्पून  *तुप... 1 टिस्पून  *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून  *गुळ चिरून... 1/2 वाटी  *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे.  आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी.  *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे ‌. * नंतर उकड

Mini Vegie Uttapam...

 #रेणू रसोई  मिनी व्हेजी उत्तपम  हे मिनी व्हेजी उत्तपम कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं यांनी परिपूर्ण आहेत, सोबतच जीवनसत्त्वे,  चवदार मसाले तसेच भरपूर भाज्या युक्त आहेत.  अतिशय पौष्टिक व चवदार देखील आहेत.  नाश्त्यासाठी, पार्टी स्नॅक्ससाठी, टिफिन मध्ये नेण्यासाठी मस्तच आहे  साहित्य  *तांदूळ .. 1वाटी 1 वाटी... 150 मिली  *हिरवी मुग डाळ ... 1 वाटी  *मेथी दाणे ... 1 टिस्पून  *किसलेले गाजर ... 1 वाटी  *कांदा पात चिरून ... 1 वाटी  *किसलेले आले ... 1 टिस्पून  *हिरवी मिरची .. 2  *मिरेपूड ... 1/2 टीस्पून  *मीठ ... 2 टिस्पून  *तिखट ... 1 टिस्पून  *शोप जाडसर कुटून... 1 टिस्पून  *जिरे .. 1/2 टीस्पून  *नारळ तेल .. 1/2 वाटी  कृती ...  *तांदूळ आणि डाळ धुवून 4 तास पाण्यात भिजवून ठेवा, भिजवताना मेथीचे दाणे घाला.  *मिक्सरमधून गुळगुळीत  बारीक वाटून घ्यावे.  * हे पीठ 7 ते 8 तास आंबू द्या.  *खोबरेल तेल सोडून बाकी सर्व साहित्य आंबवलेल्या पिठात घाला.  *छान व्यवस्थित एकत्र मिसळा.  *लोखंडी तवा 2 मिनिटे कोरडाच गरम करा, 1/2 टिस्पून नारळाचे तेल पसरवून घ्या.   3..4 मिनिटे गरम होऊ द्या. *असे केल्याने उत्तपम किंवा डोसा झटप