Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

Pakatil Puri पाकातील पुऱ्या

  Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup  1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup  *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional  Recipe...  *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes.  *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam

Coriander Vada

  Coriander Vada #RenuRasoi #Coriander #Dal #Vada #Protein #Noonion #Nogarlic Coriander leaves taste better in winter, besides it is amply available also.  Coriander is one of the super foods, helps you to look younger ☺️ Try this yummy Coriander Vada, though fried one, it consumes very less oil for frying... This is a no onion garlic recipe, but very tasty and full of flavours...😋 Ingredients... *Chickpea/ Chana Dal... 1 Cup 1 Cup... 150 ml *Chopped Coriander... 1 Cup *Green Chillies... 4 *Curry leaves... 15  *Grated ginger... 1 tsp *Salt... 1 tsp *Cumin seeds... 1/4 tsp *Oil for frying Method... * Soak Chana Dal for 2 hours. Drain out all the water by straining them in colander. Let it rest for 20 minutes. *In a mixi jar, grind first green chillies, curry leaves and ginger without adding water. Then add soaked Chana Dal, grind to a coarse paste without adding water. *Take this batter in a pan, add Salt Cumin seeds and finely chopped Coriander. Mix properly with the help of hands. *

Bhel... Recipe in Marathi

   #रेणुरसोई #भेळ भेळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच... अनेक चवदार, चटपटीत पदार्थांचे संमेलन म्हणजे भेळ.... थोडी कुरकुरीत, आंबटगोड, तिखट... ट्टाॅक 😋😋😋😋😋 आमच्या घरी तर रविवारी संध्याकाळी जेवण न करता भेळ केली तरी चालते....  या भेळे साठी लागणारी शेव, बुंदी, पापडी सर्व काही घरीच केले आहे...  साहित्य....  *मुरमुरे ... 6 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गाठी पापडी... 1 वाटी  *शेव... 1 वाटी  *खारी बुंदी... 1/2 वाटी  *शेंगदाणे... 1/2 वाटी  *उकडून चिरलेले बटाटे... 1 वाटी  *चिरलेला कांदा...1/2 वाटी  * चिरलेली कोथिंबीर... 3 टेबलस्पून  *हिरवी चटणी.... 1/2 वाटी  *चिंचेची चटणी... 1 वाटी  *मीठ आणि तिखट.... आवडीनुसार  कृती....  *कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात शेंगदाणे घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे.  त्यांना बाजूला ठेवा, गार होऊ द्या.  *मुरमुरे, उकडलेले बटाटे, 1/4 वाटी चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, 1/2  वाटी प्रत्येकी शेव, पापडी, बुंदी, तळलेले शेंगदाणे, 1 चमचा हिरवी चटणी, 3 चमचे चिंचेची चटणी, तिखट आणि मीठ घालून छान एकत्र करावे.    तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्य घालून करा.  * सर्व्ह करताना

Red Chilli Chutney

 लाल मिरची ची चटणी #रेणूरसोई #रेणूरसोई लाल मिरची ची चटणी बाजारात रसरशीत लाल भडक रंगाच्या ओल्या मिरच्या मिळत आहेत... त्या पाहिल्या बरोबर घ्यायचा मोह होतोच ☺️ आज पाहू या एक वेगळ्याच प्रकारची चटणी...  अतिशय चवदार, चटकदार पण  तिखट फार नाही ....पण सगळ्यांना आवडेल अशी साहित्य... *लाल ओल्या मिरच्या धुवुन, व मोठे मोठे तुकडे करून ‌‌... 1 वाटी 1 वाटी... 150 मिली *लसूण पाकळ्या सोलून... 5..6 *सुके खोबरे किस... 3 टेबलस्पून *भाजलेले शेंगदाणे.... 3 टेबलस्पून *मीठ... 1 टिस्पून *जीरे... 1/2 टिस्पून  *तेल... 2  टेबलस्पून *लिंबू रस... 1 टेबलस्पून *मोहरी... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *लाल मिरच्या मीठ जिरे व लिंबू रस मिक्सर मधून वाटून घ्या. *नंतर पुन्हा त्यात खोबरे किस व शेंगदाणे घालून जाडसर वाटून घ्या.  *नंतर एका कढ‌ईत येईल तेल तापवून मोहरी घालून ती तडतडल्यावर हिंगपूड व वाटलेले मिरचीचे मिश्रण घालून मंद आचेवर मोकळी होईपर्यंत परता. *आपली चटकदार मिरची ची चटणी तयार आहे. *दोन दिवस बाहेर चांगली राहते, वाटल्यास फ्रीजमध्ये ठेवावे. *तुम्ही लसूण न घालता पण करू शकता.

Dal Bati दाल बाटी चुरमा

  दाल बाटी  #रेणुरसोई  #दाल #बाटी #चुरमा #टिपोरे  राजस्थानी दाल बाटी चुरमा रेसिपी ही राजस्थानातील एक पारंपारिक रेसिपी आहे आणि घरोघरी आठवड्यात एकदा तरी बनवून खातात...   हिवाळ्यातील अतिशय चवदार आणि चविष्ट असा हा खास बेत 😋😋😋  एक परीपुर्ण थाळी आहे ही...  टिपोरे म्हणजे काय.... हिरव्या मिरचीचा लोणच्या सारखा पदार्थ...  हा एक पारंपारिक  राजस्थानी पदार्थ आहे....व नेहमीच्या रोजच्या रोज जेवणात पण करून खातात....  हा पुर्ण बेत मी  जोधपुरी शैली ने केला आहे.... आमच्या जयपूर मधील वास्तव्यात मी शिकले  आहे.  हा मेन्यू/ बेत तुम्ही सुट्टीच्या दिवशी, वीकेंडला, पार्टीसाठी, गेट टूगेदरसाठी करू शकता. जर तुम्ही मी सांगितले तसेच केले ,तर हमखास उत्तम प्रकारे बेत जमून येईल.... हे प्रमाण साधारण चार व्यक्तींसाठी आहे....  साहित्य  बाटी आणि चुरमा साठी  1 वाटी... 150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाटी  *रवा...2 वाटी  *तेल किंवा तूप.... 4 टेबलस्पून  *मीठ.... 1 टीस्पून  बाटी बुडवण्यासाठी...  साजूक तूप...1/2 वाटी  चुरमा साठी  *गव्हाचे पीठ.... 1/2 वाटी  *रवा....1/2 वाटी  *बुरा साखर किंवा गूळ... 1/4  वाटी  * तूप... 1 टेबलस्प

Ravan Pithale रावण पिठले

  रावण पिठले #रेणूरसोई मस्त पैकी थंडी पडली आहे... अशा वेळी काही तरी चमचमीत व झणझणीत खावेसे वाटते... तेंव्हा हे चमचमीत झणझणीत रावण पिठले करून पहा... अतिशय चवदार चविष्ट झाले आहे, तिखट मात्र नक्कीच आहे... ज्यांना फार तिखट आवडत नाही त्यांनी छोट्या वाटी ने करुन पहा... मस्तच लागते... साहित्य... सगळे साहित्य एकाच वाटीने घ्यायचे आहे. मी एक वाटी 150 मिली घेतली होती. *बेसन ...एक वाटी *पाणी...अडीच वाटी *शेंगदाणे तेल... एक वाटी *लाल तिखट.... एक वाटी  *मीठ ...अडीच टिस्पून *हळद.... एक टीस्पून  *चिरलेला कांदा... एक वाटी वरपर्यंत भरून  *खोबरे कीस... एक वाटी *मोहरी व जिरे... अर्धा टीस्पून प्रत्येकी *लिंबू... 1/2 कृती... *बेसन मध्ये दोन वाटी पाणी हळूहळू घालून कालवून घ्या. गुठळी होऊ देऊ नका. *एका जाड बुडाच्या कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घालून ते, तडतडल्यावर हळद व कांदा घालून कांदा थोडा मऊ होईपर्यंत परता.  *मग तिखट घालून दोन मिनिट परतावे. *नंतर त्यात खोबरे कीस व मीठ घालून छान एकत्र करा ,मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत खमंग परतावे. *नंतर बेसन व पाणी यांचे मिश्रण घालून, बेसन कालवलेले भांडे पुन्हा अर्धी वाटी पाणी