#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi Coconut Pedha Quick n Yummy... No need of cooking. Ingredients... *Dessicated Coconut...1 Cup 1cup...150 ml *MilkPowder....1/2 Cup *Powdered Sugar...1/4 Cup *Milk...as required *Cardamom powder...a pinch Method... *Mix Dessicated Coconut, Milk Powder, Sugar, & Cardamom powder. *Add Milk carefully to make a soft dough. *Make a Gooseberry size balls, roll like Pedha. *Decorate with dry fruits of your choice. #रेणूरसोई #खोबऱ्याचे #पेढे खोबऱ्याचे पेढे अतिशय स्वादिष्ट व झटपट होतात. गॅस विरहित रेसिपी आहे... साहित्य... *डेसिकेटेड खोबरे कीस... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *मिल्क पावडर...1/2 वाटी *पिठीसाखर...1/4 वाटी *वेलची पूड...1 चिमूटभर *दुध... गरजेनुसार *सुक्या मेव्याचे काप... आवडीनुसार कृती... *खोबरे कीस, मिल्क पावडर, पिठीसाखर व वेलची पूड एकत्र करा. *अगदी थोडे थोडे दुध घालून छान मउसर गोळा करा. *छोट्या आवळ्या एवढे गोळे करून, पेढ्याचा आकार द्या. *वरून सुक्या मेव्याचे काप लावून सजवावे.