बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#रेणूरसोई #वरण #फळं #stuffed भरली वरण फळं हा एक one dish meal चा प्रकार आहे. थोडी पुर्व तयारी मात्र करावी लागते .... आमच्या घरी बरेच वेळा हा प्रकार होतो... अतिशय चवदार चविष्ट व पुर्ण जेवण होते, सोबतीला आवडत असतील तर कुरकुरीत पापड... हा पदार्थ मी अगदी घरी जेवायला आलेल्या तरूण भाचे मंडळींसाठी पण केला आहे...व सर्वांना फार आवडतो . मसाल्यां व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट आणि प्रथिने युक्त... असल्याने पौष्टिक व समतोलआहार आहे.... साहित्य ... वरणा साठी * तुरीची डाळ ... 1 वाटी 1 वाटी... 150 मिली * मीठ ... 1.5 टीस्पून * हिरव्या मिरच्या ....4 चिरून * तेल ... 4 टेबलस्पून * मोहरी ... 1/4 टीस्पून * हिंग पुड ... 1/4 टीस्पून * कढीपत्त्याची पाने...10..12 * चिंचेचा कोळ... 1 टेबलस्पून * गुळ ... 1/2 टेबलस्पून * गोडा मसाला... 1 टिस्पून फळांसाठी ... * गव्हाचे पीठ ... 1 वाटी * तेल ... 3 टीस्पून * मीठ ... 3/4 टीस्पून * लाल तिखट ... 1/2 टीस्पून * हळद ... 1/4 टीस्पून * जिरे ... 1/4 टीस्पून * ओवा ... 1/4 टीस्पून मसाला/ आतील सारण... *उकडलेले बटाटे, साले काढून किसून...1.5 वाटी *आले लसूण वाटून...1/