#रेणू रसोई
मिनी व्हेजी उत्तपम
हे मिनी व्हेजी उत्तपम कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं यांनी परिपूर्ण आहेत, सोबतच जीवनसत्त्वे, चवदार मसाले तसेच भरपूर भाज्या युक्त आहेत.
अतिशय पौष्टिक व चवदार देखील आहेत.
नाश्त्यासाठी, पार्टी स्नॅक्ससाठी, टिफिन मध्ये नेण्यासाठी मस्तच आहे
साहित्य
*तांदूळ .. 1वाटी
1 वाटी... 150 मिली
*हिरवी मुग डाळ ... 1 वाटी
*मेथी दाणे ... 1 टिस्पून
*किसलेले गाजर ... 1 वाटी
*कांदा पात चिरून ... 1 वाटी
*किसलेले आले ... 1 टिस्पून
*हिरवी मिरची .. 2
*मिरेपूड ... 1/2 टीस्पून
*मीठ ... 2 टिस्पून
*तिखट ... 1 टिस्पून
*शोप जाडसर कुटून... 1 टिस्पून
*जिरे .. 1/2 टीस्पून
*नारळ तेल .. 1/2 वाटी
कृती ...
*तांदूळ आणि डाळ धुवून 4 तास पाण्यात भिजवून ठेवा, भिजवताना मेथीचे दाणे घाला.
*मिक्सरमधून गुळगुळीत बारीक वाटून घ्यावे.
* हे पीठ 7 ते 8 तास आंबू द्या.
*खोबरेल तेल सोडून बाकी सर्व साहित्य आंबवलेल्या पिठात घाला.
*छान व्यवस्थित एकत्र मिसळा.
*लोखंडी तवा 2 मिनिटे कोरडाच गरम करा, 1/2 टिस्पून नारळाचे तेल पसरवून घ्या.
3..4 मिनिटे गरम होऊ द्या.
*असे केल्याने उत्तपम किंवा डोसा झटपट निघून येतो.
*आता एक मोठा डाव पीठ पसरवून घ्या. सगळीकडे छान एकसारखे जाड असले पाहिजे. त्याच्या चारी बाजूंनी खोबरेल तेल घालून घ्या. मध्यम आचेवर झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्या .
दोन मिनिटांनी झाकण काढून उत्तपम पलटवून दुसऱ्या बाजूने पण अगदी थोडेसे तेल घालून शिजवून घ्या.
*मुलांना डब्यात देताना वाटी च्या सहाय्याने छोटे छोटे गोल कापून द्या
*शेंगदाण्याच्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.
शेंगदाण्याची चटणी ...
*1/4 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1/2 चमचे लाल तिखट, 1/4 टीस्पून मीठ , 1 वाटी दही
*सगळे साहित्य एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्या
*हवे असल्यास 1/4 वा टीस्पून साखर घाला.
* चटपटीत चटणी तयार आहे.
Rice kutala ghycha Ani lokhadi tava nasle tar nonstick kiva aluminimumcha tava chale ka
ReplyDeleteशक्यतो जाड तांदूळ घ्यावा, दोसा इडली करता वापरतो तो... उकडीचा तांदूळ नाही...
ReplyDeleteतुमच्या घरी रोज परतायचे जो खाता तो पण चालेल...
लोखंडी तव्यावर जास्त खमंग होतात...
तो नसेल तर नॉनस्टिक तव्यावर करा