#रेणुरसोई
#भेळ
भेळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच...
अनेक चवदार, चटपटीत पदार्थांचे संमेलन म्हणजे भेळ....
थोडी कुरकुरीत, आंबटगोड, तिखट... ट्टाॅक
😋😋😋😋😋
आमच्या घरी तर रविवारी संध्याकाळी जेवण न करता भेळ केली तरी चालते....
या भेळे साठी लागणारी शेव, बुंदी, पापडी सर्व काही घरीच केले आहे...
साहित्य....
*मुरमुरे ... 6 वाटी
1 वाटी...150 मि.ली
*गाठी पापडी... 1 वाटी
*शेव... 1 वाटी
*खारी बुंदी... 1/2 वाटी
*शेंगदाणे... 1/2 वाटी
*उकडून चिरलेले बटाटे... 1 वाटी
*चिरलेला कांदा...1/2 वाटी
* चिरलेली कोथिंबीर... 3 टेबलस्पून
*हिरवी चटणी.... 1/2 वाटी
*चिंचेची चटणी... 1 वाटी
*मीठ आणि तिखट.... आवडीनुसार
कृती....
*कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात शेंगदाणे घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे. त्यांना बाजूला ठेवा, गार होऊ द्या.
*मुरमुरे, उकडलेले बटाटे, 1/4 वाटी चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, 1/2 वाटी प्रत्येकी शेव, पापडी, बुंदी, तळलेले शेंगदाणे, 1 चमचा हिरवी चटणी, 3 चमचे चिंचेची चटणी, तिखट आणि मीठ घालून छान एकत्र करावे.
तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्य घालून करा.
* सर्व्ह करताना पुन्हा थोडी हिरवी चटणी, चिंचेची चटणी घालून शेव, चिरलेली कोथिंबीर आणि कांदे घालून सजवा.
*हिरवी चटणी...
हिरवी मिरची...10 चिरून
चिरलेली कोथिंबीर...1/2 वाटी
लिंबाचा रस... 1 टेबलस्पून
मीठ... 1/2 टीस्पून
जिरे... 1/4 टीस्पून
* सगळे साहित्य एकत्र करा, 2 टिस्पून पाणी घालून मिक्सरमधून चटणी वाटून घ्या.
*चटणी टिकावी म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे, 2..3 दिवस टिकते.
*चिंचेची चटणी....
चिंच...3 टेबलस्पून
गूळ... 2 टेबलस्पून
धने पूड .. 1 टीस्पून
काळे मीठ ... 1/2 टीस्पून
तिखट... 1/4 टीस्पून
* चिंच कोमट पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा.
नंतर छान कोळून घ्या. त्यात गुळ, धनेपूड, काळे मीठ व तिखट घालावे.
चवीनुसार थोडे साधे मीठ घालून चव पाहून घ्या.
मस्त आंबट गोड चटपटीत चव आली पाहिजे.
* एका काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे.
* तुम्ही ही चटणी रोजच्या स्वयंपाकात भाजी, आमटी त पण वापरू शकता.
शेव, पापडी, बुंदी एक दिवस करा. मग दुसऱ्या दिवशी भेळ करून आस्वाद घ्या...
*शेव...पापडी
सविस्तर रेसिपी खालील लिंकवर....
http://www.renurasoi.com/2019/06/shevgathipapadi.html?m=1
*खारी बुंदी
खारी बुंदीची सविस्तर रेसिपी खालील लिंकवर...
Comments
Post a Comment