#RenuRasoi
Red Pumpkin kashmiri style
#Red #Pumpkin... #Kashmiri
#Kashiphal ka #Roganjosh
I first made this vegetable many years ago....and prepared it again.
It tastes very different from our usual vegetables ....
Nice aroma of saffron, cardamom ... cloves, use of curd and home made ghee ... in addition to spices .... 😋😋😋
I like this vegetable very much with hot steamed Rice .... of course it tastes good with Roti too..👍🏼
Ingredients...
*Red pumpkin ... 500 gms ...peel and cut into small 1 inch cubes.
*Oil .... 4 tbsp
*Home made Ghee ... 1 tbsp
*Homemade Curd... 1 cup
1 cup ... 200 ml.
*Clove ... 4-5
*Green Cardamom ... 2-3
*Saffron ... 15 strands
*Asafoetida .... 1/4 tsp
*Dry Ginger powder .... 1 tsp
*Fennel seeds powder ... 1/2 tsp
*Kashmiri red chilli powder ... 1 tsp
*Salt ... 1 tsp
*Chopped Coriander... 1 tbsp
Method....
*Heat oil in a pan, add cloves and Cardamom. Then add chopped pumpkin and saute for 5 to 6 minutes.
* Beat the curd in a pan and add saffron, dry ginger powder, fennel seeds powder, asafoetida and Kashmiri red chilli powder and mix well.
* Pour this curd mix on the pumpkin pieces in a pan and saute again.
* Then add 3 cups of water and cover, sauting occasionally. When oil is released, add salt and mix properly.
* Heat ghee and mix with vegetable. Mix properly and saute again for two minutes.
*Garnish with coriander and serve.
#रेणूरसोई
#लाल #भोपळा #भाजी... #काश्मिरी पद्धत
#काशीफल का #रोगनजोश
मी ही भाजी अनेक वर्षांपूर्वी केली होती...😃
आता परत आठवण झाली व केली...
आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा खुप वेगळी चव येते.... छानच लागते...
छान केशर, वेलची...लवंगी चा सुगंध, दही व साजुक तुपाची चव... जोडीला अजून सुगंधी मसाले....वाह ! 😋😋😋
मला ही भाजी गरमागरम भाताबरोबर फार आवडली.... अर्थात पोळी सोबत पण छान लागते 👍🏼👍🏼
साहित्य...
*लाल भोपळा...500 ग्राम साल काढून छोटे 1 इंचाचे चौकोनी तुकडे करून
*तेल....4 टेबलस्पून
*तुप... 1 टेबलस्पून
*दही...1 वाटी
1 वाटी...200 मिली.
*लवंग... ४-५
*हिरवे वेलदोडे... २-३
*केशर काड्या..15
*हिंग....1/4 टीस्पून
*सुंठ पुड.... 1 टीस्पून
*बडिशेप पुड... 1/2 टीस्पून
*काश्मिरी लाल मिरची पावडर... 1टीस्पून
*मीठ... 1 टीस्पून
*कोथिंबीर चिरून...1 टेबलस्पून
कृती....
*कढईमध्ये तेल घेऊन तापायला ठेवावे, त्यामध्ये लवंग आणि वेलदोडे घालावेत.नंतर त्यामध्ये चिरलेल्या भोपळ्याच्या फोडी घालून पाच ते सहा मिनिटे परतावे.
*एका भांड्यात दही फेटून घेऊन त्यामध्ये केशर ,सुंठ पुड ,बडीशेप पुड ,हिंग, आणि काश्मिरी लाल मिरची घालून छान एकत्र करून घ्या.
*हे मिश्रण कढईतील भोपळ्याच्या फोडींवर घालून पुन्हा छान परतावे.
*मग 3 वाटी पाणी घालून झाकून ठेवून द्या, अधुन मधुन परतत रहा. तेल सुटत आले की मीठ घालावे.
*वरून 1 टेबलस्पून तुप गरम करून भाजीवर
घालून छान एकत्र करून परत दोन मिनिटे शिजवा.
*कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
Comments
Post a Comment