Skip to main content

Corn Garlic Pulao

  #RenuRasoi #Corn #Garlic #Pulao  Corn Garlic Pulao  This is a very tasty pulao recipe. Easy to prepare and mildly spicy, so everyone in the family right from kids to elders can enjoy this.  You can skip garlic, if you wish. Goes very well with any Raita, Dal or Curry.  Ingredients  *Raw rice... 1 Cup  1 Cup... 150 ml  *Sweet corn kernels... 1 Cup  *Chopped garlic... 1 tbspn  *Oil... 1 tbspn  • Black pepper... 1 tsp  • Salt ... 1 tsp  • Hot water... 3 Cups  Method...  *Wash rice well and keep aside.  * Grind black pepper to a coarse powder.  *Heat oil in a heavy based pan or kadhai.  *Deep fry chopped garlic till golden in colour, remove and keep aside.  *Now in the same oil add washed rice and black pepper powder. Saute till sticky.  *Add sweet corn kernels and salt. Mix properly.  *Add water little less than 3 Cups, mix properly. Approximately 2.5 cups. We can use the remaining water if needed.  • Cook till all the water get absorbed.  • Serve by adding fried garlic and mint leaves.

Dryfruit Roll

 




#RenuRasoi

Dryfruit Roll

These Roll are very easy to prepare in home......

They are delicious and healthy too..... specially in winter.

Here we have not used Mixer for grinding dates, nor we have soaked them in water. 

Ingredients...

1 Cup.... 150 ml.

*Cashews.... 1/2 Cup

*Almonds.... 1/2 Cup

*Walnut.... 1/2 Cup

*Pistachio.... 1/2 Cup

*Seedless Dates/ Khajur... 2 Cup

*Homemade Ghee.... 1 tablespoon

*Poppy seeds... 1 tablespoon

Method....

*Crush Cashews, Almonds, Walnuts and Pistachio from the mixer roughly on pulse/ inch mode.

Crush each one seperately.

*Take care not to make a powder, they should be crunchy enough to chew. 

*Chopp the dates/khajur finely into tiny pieces,  with the help of knife.

*Heat Ghee in pan, add poppy seeds, after a minute add chopped Dates/Khajur, saute for a minute and immediately switch off the gas.

*Remove the pan from the Gas, with the help of the back of the spoon, or masher mash the dates till they become soft.

*Within 3..4 minutes it will become a  soft dough.

*Add crushed dry fruits, mix well.

*Divide in 4 equal parts, and make the rolls. Refrigerate these Roll for 30 minutes, take out of fridge.

*Slice them with the help of a knife.

Note....

*You can use any dryfruit of your choice. Make sure dryfruit and dates/ khajur should be in equal quantity.

*Saute dates/ khajur in ghee not more than 2 minutes, else they won't get mashed easily.

#रेणूरसोई

 #ड्रायफ्रूट #रोल

#सुकामेवा #रोल

सुक्‍या मेव्याचे हे रोल घरी करायला सोपे आहेत...

चवीला फारच स्वादिष्ट पौष्टिक पण आहेत...

झटपट होणारी ही मिठाई तुमच्या घरातील सर्वांना फार आवडेल.

या रेसिपी मध्ये खजूर वाटण्यासाठी मिक्सर चा वापर अजिबात केला नाही.... तसेच पाण्यात पण भिजवले नाही आहेत.

 

 साहित्य ...

 1 वाटी.... 150 मि.ली.

 *काजू .... 1/2 वाटी

 *बदाम .... 1/2 वाटी

 *अक्रोड .... 1/2 वाटी

 *पिस्ता .... 1/2 वाटी

 *सीडलेस / बिन बियांचा खजूर ... 2 वाटी

 *साजूक तूप .... 1 टेबलस्पून

 *खसखस... 1 टेबलस्पून

 कृती....

 * मिक्सरमधून पल्स/ इंच मोड वर काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता जाडसर भरडून घ्या. सगळा सुकामेवा वेग वेगळा भरडून घ्या.

 * बारीक पुड तयार होणार नाही याची काळजी घ्या, ते मोठे अर्धवट च असावेत. त्यामुळे चव छान येते.

 * सुरीच्या सहाय्याने खजूर बारीक चिरून घ्या.

 * कढईत तूप गरम करावे, खसखस ​​घाला, एक मिनिटानंतर चिरलेले खजूर घाला, एक मिनिट परतावा आणि लगेच गॅस बंद करा.

 * गॅस वरून कढ‌ई बाजूला काढून घ्या. लगेचच

मोठ्या चमच्याच्या मागील भागाच्या सहाय्याने किंवा मॅशर वापरून खजूर म‌ऊ एक जीव गोळा होईपर्यंत करून घ्या.

 *तीन चार मिनिटात छान मऊसर गोळा होतो, मग त्यात सुक्या मेव्याची भरड घालून छान एकत्रित गोळा करा.

 * 4 समान भागात विभागून रोल बनवा.  हे रोल 30 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा, फ्रीजमधून बाहेर काढा.

 * धारदार सुरीच्या सहाय्याने तुकडे कापून घ्या.

 टीप ....

 * तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा वापरू शकता.  सुकामेवा व खजूर समान प्रमाणात असले पाहिजेत.

 * खजूर तूपात २ मिनिटांपेक्षा जास्त परंतु नये  अन्यथा ते सहज मॅश/ म‌ऊ होणार नाहीत.


Comments

Popular posts from this blog

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Chitranna

#रेणूरसोई #चित्रान्न भात #रावणभात विदर्भात चंद्रपूर जिल्ह्या ला लागुनच आंध्र प्रदेशाची सीमा आहे... त्यामुळे तेलगु जेवण शैली चा प्रभाव येथील आहारामध्ये आहे. घरी काही मोठं कार्य असेल तर जे स्वयंपाक करायला तेलंगणा भागातील स्वयंपाकी  येतात त्यांना "अय्या" असे म्हटले जाते... तर उत्तरेकडील स्वयंपाकी असतील तर "महाराज" किंवा "पंडित जी"... चित्रान्ना भात किंवा रावण भात हा लहान पणापासून खात आलो आहे. अतिशय चवदार लागणारा हा भात गार च खाल्ला जातो व अतिशय अप्रतिम लागतो. हा भात विशेष करून उन्हाळ्यात कैरी घालून करतात... एरवी वर्षभर पण लिंबू रस केला जातो... अन्ना म्हणजे भात... हा भात सकाळी करून संध्याकाळी खाल्ला तर सगळे मसाले मुरल्यामुळे जास्त चविष्ट लागतो. आज पाहु या अतिशय चवदार चविष्ट असा चित्रान्न भात साहित्य... साहित्य ...  * तांदूळ .... 1 वाटी  * शेंगदाणे ... 2  टेबलस्पून स्पू  * काजू ... 5.. ऐच्छिक  * कैरी किसून... 2 टेबलस्पून  * फुटाण्याच्या डाळ्या .... 2 टेबलस्पून  * सुके खोबरे कीस...1/4 वाटी  * उडीद डाळ ... 1 टीस्पून  * पांढरे तीळ...1 टीस्पून