#रेणूरसोई
#मसालेभात #पानकोबी
पानकोबी चा मसालेभात
सणा चा स्वयंपाक करताना कांदा लसूण घालत नाही. तेंव्हा हा मसालेभात करून पहा...
हा मसालेभात फार चवदार व स्वादिष्ट लागतो.
भरपूर भाजी व योग्य प्रमाणात मसाल्यांचा वापर भाताला अधिक खमंग व सुगंधी बनवतो.
हा भात जेंव्हा घरी शिजत असतो तेंव्हा आजुबाजुचा परीसर अप्रतिम अशा सुगंधाने दरवळत असतो.
पावसाळा किंवा हिवाळ्यात सोबत हवी गरमागरम कढी ....तर उन्हाळ्यात मस्त थंडगार ताक किंवा मठ्ठा...
सोबत जिलबी असेल तर ... अतिशय अप्रतिम 😋😋😋😋
साहित्य...
*सुगंधी तांदूळ... एक वाटी
1वाटी...150 मिली
*पानकोबी बारीक चिरून...2 वाटी
*शेंगदाणे... 1/4 वाटी
*सुके खोबरे कीस... 1/4 वाटी
*कोथिंबीर चिरून... अर्धी वाटी
*हिरवी मिरची चिरून...3
*आलेकीस....1 टिस्पून
*कढीपत्ता ...15 पाने
*तेल... 5 टेबलस्पून
*हळद...1/2 टिस्पून
*मीठ...1 टिस्पून
*गरम मसाला...1/2 टिस्पून
*गोडा मसाला...1 टिस्पून
*धनेपूड...1 टिस्पून
कृती...
*सर्व प्रथम शेंगदाणे स्वच्छ धुवून पाणी घालून भिजवून घ्या. कमीतकमी 30 मिनिटे.
*तांदूळ स्वच्छ धुवून, पाणी निथळून बाजूला ठेवून द्या.
*खोबरे कीस, मिरची, कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने व आले किस पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्या.
*कुकरमध्ये तेल तापवून हळद, मिरची कोथिंबीर चे वाटण मंद आचेवर खमंग परतून घ्या.
*मग पानकोबी व शेंगदाणे, घालून 3..4 मिनिटे परतून घ्या. धनेपूड, गोडा मसाला, गरम मसाला घाला.
*धुतलेले तांदूळ घालून हलक्या हाताने एकत्र करा.
*दोन वाट्या गरम पाणी व मीठ घालून छान ढवळून घ्या.
*मध्यम आचेवर एक शिट्टी वाजली की गॅस लगेच बंद करा.
*वाफ जिरली की गरमागरम भात, साजूक तुप व कढी सोबत सर्व्ह करा.
गरम मसाला रेसिपी....
तुम्हाला ह्याची रेसिपी खालील लिंक वर बोट ठेवले कि इंग्लिश व मग मराठी भाषेत मिळेल...
http://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html?m=1
कढी ची रेसिपी
ही रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल...
http://www.renurasoi.com/2019/07/kadhi.html?m=1
Comments
Post a Comment