Skip to main content

Corn Garlic Pulao

  #RenuRasoi #Corn #Garlic #Pulao  Corn Garlic Pulao  This is a very tasty pulao recipe. Easy to prepare and mildly spicy, so everyone in the family right from kids to elders can enjoy this.  You can skip garlic, if you wish. Goes very well with any Raita, Dal or Curry.  Ingredients  *Raw rice... 1 Cup  1 Cup... 150 ml  *Sweet corn kernels... 1 Cup  *Chopped garlic... 1 tbspn  *Oil... 1 tbspn  • Black pepper... 1 tsp  • Salt ... 1 tsp  • Hot water... 3 Cups  Method...  *Wash rice well and keep aside.  * Grind black pepper to a coarse powder.  *Heat oil in a heavy based pan or kadhai.  *Deep fry chopped garlic till golden in colour, remove and keep aside.  *Now in the same oil add washed rice and black pepper powder. Saute till sticky.  *Add sweet corn kernels and salt. Mix properly.  *Add water little less than 3 Cups, mix properly. Approximately 2.5 cups. We can use the remaining water if needed.  • Cook till all the water get absorbed.  • Serve by adding fried garlic and mint leaves.

Jaggery Roti... गुळ पोळी

 


#RenuRasoi
Happy Makar Sankranti to all ...
#Jaggery  #Sesame #Roti
This poli is very tasty and delicious😋😋😋😋
In Maharashtra we prepare this sweet Roti on every year's Sankranti festival.
It's a traditional Recipe. In every household it will prepared and relished by all.
This sweet Roti is very convenient to carry while travelling, for trekking ,can be taken with you even while travelling to abroad.  They lasts  for 10 ... 12 days comfortably.
These are nutritious and energizing.
 
For Roti
*Whole wheat flour... 2 Cup
One cup ... 150 ml
*Oil ... 4 tablespoons
* Salt ... a pinch
Method ....
Combine all the ingredients for the dough,add  water gradually and  make the dough. It should be harder like Puri dough. Cover and let it rest for at least an hour.
For the stuffing
* Roasted sesame seeds powder... 1 cup
*Dry roasted Chick pea flour... 1 tbsp
*Grated jaggery ... 1.5 cups
For roasting Roti
Home made Ghee...melted ... 1/2 cup
Method...
* Combine all the ingredients for the stuffing.  Mix well.  If you like, add cardamom powder, but original flavour of sesame and jaggery tastes better.
* Take a little bigger size dough than lemon, roll like Puri, avoid using flour for rolling. Use minimum if necessary.
Put 2 tablespoon jaggery mix, seal carefully from all the sides.
Roll out the Roti of 5...6" diameter with gentle hands.
* Heat the tawa, put this rolled roti & dry roast on low flame from both sides .
Then Roast by applying ghee from both the sides till  pink. 
All this process should be done over low flame.
* Nice  crispy sweet jaggery Roti is ready. Will last for ten to twelve days.

#रेणूरसोई

सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...💐

गुळाची पोळी‌

ही पोळी अतिशय अप्रतिम व स्वादिष्ट लागते 😋😋😋😋

लांब पल्ल्याच्या प्रवासात, ट्रेकिंग ला जाणारे गिर्यारोहक, अगदी परदेशात सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकतो. 10...12 दिवस आरामात टिकतात.

ही पोळी पौष्टिक व उर्जा देणारी आहे.

या पोळी चे वरील आवरण फक्त कणकेचे आहे. आम्ही गुळाची पोळी दोन्ही बाजूने शेकून झाल्यावर, साजूक तुपात तळतो... त्यामुळे वरतून तुप नसले तरी चालते खुप खमंग लागते...

#रेणूरसोई

#गुळाची #पोळी

आवरण

*कणीक 2 वाटी

एक वाटी... 150 मिली

*तेल... मोहन म्हणुन... 4 टेबलस्पून 

*मीठ ... चिमुटभर

कृती....

आवरणासाठी चे सर्व साहित्य एकत्र करून कमीत कमी पाणी घालून घट्ट कणिक भिजवावी. व कमीत कमी एक तास तरी मुरू द्या. हे झाले वरील आवरण. 

आतील सारणासाठी... 

*भाजलेल्या तिळाची पूड...1 वाटी 

*बेसन कोरडेच भाजून... 1 टेबल स्पून 

*किसलेला गूळ... 1.5 वाटी

पोळी तव्यावर शेकण्यासाठी

साजूक पातळ तूप...1/2 वाटी

कृती...

*सारणासाठी चे सर्व साहित्य एकत्र करावे. छान मिसळून घ्या. आवडत असल्यास वेलदोडे पूड घालावी पण तिळ गुळाची खमंग चव छान लागते. 

*भिजलेली कणीक कमीत कमी एक तास तरी मुरू द्यावे मग लिंबू पेक्षा थोडा मोठा गोळा घेऊन पुरी लाटावी त्यात 2 टेबलस्पून सारण घालून चारी बाजूंनी बंद करून हलक्या हाताने पाच  सहा इंचाची पोळी लाटावी. लाटताना गरज वाटली तरच पिठी लावून लाटा.

*प्रथम तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावे व नंतर साजूक तूप सोडून गुलाबी शेकून घ्यावे. ही सर्व कृती मंद आचेवर च करा.

*पापडा सारख्या छान कडक खुसखुशीत पोळ्या होतात व दहा बारा दिवस टिकतात.

Comments

Popular posts from this blog

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Chitranna

#रेणूरसोई #चित्रान्न भात #रावणभात विदर्भात चंद्रपूर जिल्ह्या ला लागुनच आंध्र प्रदेशाची सीमा आहे... त्यामुळे तेलगु जेवण शैली चा प्रभाव येथील आहारामध्ये आहे. घरी काही मोठं कार्य असेल तर जे स्वयंपाक करायला तेलंगणा भागातील स्वयंपाकी  येतात त्यांना "अय्या" असे म्हटले जाते... तर उत्तरेकडील स्वयंपाकी असतील तर "महाराज" किंवा "पंडित जी"... चित्रान्ना भात किंवा रावण भात हा लहान पणापासून खात आलो आहे. अतिशय चवदार लागणारा हा भात गार च खाल्ला जातो व अतिशय अप्रतिम लागतो. हा भात विशेष करून उन्हाळ्यात कैरी घालून करतात... एरवी वर्षभर पण लिंबू रस केला जातो... अन्ना म्हणजे भात... हा भात सकाळी करून संध्याकाळी खाल्ला तर सगळे मसाले मुरल्यामुळे जास्त चविष्ट लागतो. आज पाहु या अतिशय चवदार चविष्ट असा चित्रान्न भात साहित्य... साहित्य ...  * तांदूळ .... 1 वाटी  * शेंगदाणे ... 2  टेबलस्पून स्पू  * काजू ... 5.. ऐच्छिक  * कैरी किसून... 2 टेबलस्पून  * फुटाण्याच्या डाळ्या .... 2 टेबलस्पून  * सुके खोबरे कीस...1/4 वाटी  * उडीद डाळ ... 1 टीस्पून  * पांढरे तीळ...1 टीस्पून