#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#रेणूरसोई
#मेथी #आप्पे
मेथी चे आप्पे
सध्या अतिशय चवदार अशी मेथी ची भाजी बाजारात मिळते आहे. ही भाजी चवदार व औषधी पण आहे.
तेंव्हा आज केले आहेत चवदार चविष्ट आपले जे मधुमेह झालेल्या लोकांना पण पोटभर खाता येतील.
पीठ आंबवुन किंवा न आंबवता केले तरी अतिशय अप्रतिम लागतात.
हे आप्पे अतिशय खमंग व खुसखुशीत लागतात. सर्व्ह करताना वेगळी चटणी नाही केली तरी चालेल.
साहित्य....
*हिरवी मुगाची डाळ...१ वाटी
*रवा...१ वाटी
*दही...आंबट...१ वाटी
*पाणी...१ वाटी
*कांदा चिरून... १ वाटी
*मेथी स्वच्छ धुऊन चिरून...१ वाटी
*आले किस...१ टिस्पून
*मीठ.... २ टिस्पून
*मिरेपूड...१/२ टिस्पून
*हिरवी मिरची... बारीक चिरून...२
*कोथिंबीर चिरून...१/२ वाटी
*हळद...१/४ टिस्पून
*खोबरेल तेल...१/२ वाटी
कृती....
*मुग डाळ कोरडीच मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. थोडी जाडसर पण चालेल.
*खोबरेल तेल सोडून बाकी सर्व साहित्य छान एकत्र करून घ्या.
*३० मिनिटे मुरु द्या. रात्रभर भिजवून ठेवले तरी चालेल. फ्रीजमध्ये ठेवु शकता.
*आप्पेपात्र गॅसवर ३ मिनिटे गरम करून, मग
खोबरेल तेल लावून घ्यावे. वरील पिठ छान एकत्र करून,पात्रात घालून बाजुने व वरून खोबरेल तेल सोडावे. झाकण ठेवून २ मिनिटांनी झाकण काढून चमच्याने अलगद पलटवुन, दुसऱ्या बाजूने पण खमंग कुरकुरीत करून घ्या.
*गरम गरम तर छान लागतातच, पण गार सुद्धा चवदार लागतात.
*तुम्ही रवा न घालता गव्हाचा दलीया , भिजवून वाटून घालु शकता. गव्हाच्या दलीया सोबत च मुगडाळ पण भिजवून घ्या.
*दही, कोथिंबीर, आले, मिरची असल्याने वेगळ्या चटणी ची गरज नाही.
*कर्बोदके, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स ने परीपुर्ण तरीही खमंग व रूचकर.
*खोबरेल तेल घातल्यामुळे खमंग तर आहेच व अल्झायमर सारख्या रोगाला दुर ठेवण्यास मदत होते.
*सकाळी केलेले आप्पे रात्री पर्यंत छान लागतात व राहतात.
Nice recipe... I will definitely try
ReplyDeleteThank you 🙏🏼
Delete