#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Makai #Mushroom
Makai Mushroom..
A very tasty and spicy veg preparation...
It tastes Yummmm 😋
Can be prepared for Party, Get Together, Dinner Lunch,...
Goes very well with Rice, Roti..
Enjoy
Ingrediants. ...
*200 gms Fresh Mushrooms.
*Sweet corn...1.5 Cups
*Onions chopped...1 Cup
*Grated Ginger...1 tsp
*Green Chillies...3
*Red Tomatoes....3
*Oil....3 tbsp
*Red Chilli Powder...1 tsp
*Coriander Powder ...2 tsp
*Salt...1 tsp
*Turmeric...1/2 tsp
*Mustard n Cumin Seeds...1/2 tsp each
*Fenugreek seeds Powder... 1/4 tsp
Or Fenugreek Seeds...12
Method. ..
*Wash Mushrooms by soaking in Salt water. Clean one by one by rubbing with hands. Make thin slices.
*Make a paste of Ginger, Green Chillies & Tomatoes from the mixer.
*Chopp the Onions.
*Heat Oil in the pan. ..add Mustard and Cumin seeds , let it splutter, add
Fenugreek Seeds Powder.
*Add chopped Onions n saute.
*Add Turmeric, Chilli Powder, Coriander seeds Powder and Salt.
Mix properly.
*Add Tomato...Ginger.. Chilli Paste.
Saute till Oil leaves the sides of the Pan.
*Add Mushrooms n saute for 3 mts.
*Add Sweet Corn ...saute on low flame for 2 minutes.
*Add 2 cups hot water...let it cook for 5 mts.
*Done.
*Serve hot with Rice or Roti...
Enjoy...
#रेणूरसोई
#मकई #मश्रुम
मकई मश्रुम
साहित्य. ...
*ताजे मश्रुम... 200 ग्राम
*मका/ स्विट काॅर्न...1.5 वाटी
*कांदे चिरून...1 वाटी
* लाल टमाटे ...3
*आले कीस...1 टिस्पून
*हिरवी मिरची...3
*लाल तिखट... 1 टिस्पून
*मीठ....1 टिस्पून
*हळद. ..1/2 टिस्पून
*तेल.... 3 टेबलस्पून
*धनेपूड... 2 टिस्पून
*मेथीदाणे...12 किंवा मेथीपूड...1/4 टिस्पून
*मोहरी व जीरे...1/4 टिस्पून
कृती...
*मश्रुम मिठाच्या पाण्यात बुडवून, हाताने चोळुन स्वच्छ धुवुन चकत्या करा.
*कांदे चिरून घ्या.
*आले कीस, मिरची व टमाटे मिक्सर मधून वाटून घ्या.
*तेल तापवून मोहरी..जिरे व मेथी घालून फोडणी करा.
*बारीक चिरलेला कांदा घालून खमंग परतून घ्या.
* मग त्यात तिखट, हळद, मीठ व धनेपूड घालून छान एकत्र करा.
*टमाटे...आले... मिरची वाटण घाला, बाजूला तेल सुटेपर्यंत छान खमंग परतून घ्या.
*मश्रुम च्या चकत्या घालून 3 मिनिटे परतावे.
*मक्याचे दाणे घालून मंद आचेवर 2 मिनिटे परता.
*त्यात दोन वाटी गरम पाणी घालून ढवळून पाच मिनिटे उकळून घ्यावेत.
*चवदार व खमंग भाजी तयार. ..
*गरम पोळी..भात..भाकरी...कशासोबतही छान लागते.
Comments
Post a Comment