#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#SweetnSour
Kairi Kanda Varan...
Onion n Raw Mango Dal
Pyaj aur Kachhe Aam ki dal
This simple but Tangy Dal preparation is very favourite in our home....
Very very tasty 😋😋😋😋
Ingredients....
*Split Pigeon/Arahar dal....1 cup *Onion chopped....1 cup
*Grated Raw Mango... 1/2 cup
*Oil... 2 tbsp...
*Green Chillies... 6 chopped
OR
*Red Chilli Powder... 1 tsp
for Tempering...
*Mustard & Cumin Seeds...1/4 tsp each
*Fenugreek seeds...7..8
*Jaggery... 3 tsp
*Salt... 1 tsp
*Turmeric powder.... 1/2 tsp
Method...
*Pressure Cook Raw dal by adding Turmeric & 3 Cups water, when it cools take out of Cooker , mash properly with the back of the laddle.
*Heat Oil in a kadhai...add Fenugreek, Mustard & Cumin seeds when it splutters add Green Chillies...saute...add chopped Onion n grated Raw Mango...saute till Onion becomes soft...add jaggery n Salt.
*Add cooked dal n one cup water...let it simmer for 5 minutes.
*Done..
*Garnish with Coriander.
*Serve hot with Rice n Ghee.
*Enjoy.
Note...If you are using Red Chilli Powder, add at the time of Green Chillies.
#रेणुरसोई
#आंबट #गोड
कैरी कांदा वरण ...
उन्हाळा सुरू झाला आमच्याकडे कैरी चे अनेक प्रकार करणे सुरू होते.
त्यातील च एक आहे सर्वांचे आवडते असे कैरी कांद्याचे वरण...
अतिशय साधे पण चवीला भन्नाट असे हे आंबटगोड वरण म्हणजे...😋😋😋😋😋
साहित्य ....
*तुरीची डाळ ....1 वाटी
*कांदा चिरून ....1वाटी
* किसलेली कैरी ....1/2 वाटी
*तेल ... 2 टेबलस्पून
*हिरव्या मिरच्या चिरून ... 6
किंवा
* लाल तिखट ... 1 टीस्पून
फोडणी साठी ...
* मोहरी आणि जिरे ... प्रत्येकी 1/4 टीस्पून
* मेथीचे दाणे ... 7..8
* गूळ ... 3 टीस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
* हळद .... 1/2 टीस्पून
कृती ...
* प्रेशर कुकरमध्ये तुरीची डाळ व हळद व 3 वाटी पाणी घालून शिजवून घ्या. थंड झाल्यावर कुकरमधून बाहेर काढून डावाच्या सहाय्याने छान घोटून एकजीव करून घ्या.
* एका कढईत तेल गरम करून त्यात मेथी, मोहरी आणि जिरे घालून तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची घालावी ... परतावे, चिरलेला कांदा, किसलेली कैरी घाला ... कांदा मऊ होईस्तोवर परतून घ्या ... गूळ व मीठ पण घालून छान एकत्र करा.
* घोटलेली डाळ आणि एक वाटी पाणी घालून ... 5 मिनिटे उकळी येऊ द्या.
* कोथिंबिरीने सजवा.
* गरमागरम वरण भात व तुप सर्व्ह करा.
टीप...
जर तुम्ही लाल तिखट घालणार असाल तर हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट घाला.
Sahi
ReplyDeleteधन्यवाद 🙏☺️
DeleteGul Nahi ghatla tar chalto ka chav badlel ka
ReplyDeleteहो चालेल...पण वरण आंबट होईल...
Deleteवाटल्यास साखर घालून करु शकतो...
आंबटगोड चव खुप छान येते...
सुंदर वेगळीच आहे रेसिपी, कुठली आहे? विदर्भाची का? मी नक्की करून पाहीन
ReplyDeleteहो...अग अगदी बरोबर 👍
Deleteविदर्भात उन्हाळ्यात घरोघरी खातात.... अतिशय अप्रतिम लागते