#RenuRasoi
#Ladoo #Coconut #Cashew
Coconut Ladoo
Try these Delicious Ladoos when ever you are having craving for the sweet...
They are easy, quick n Yummy too....😋😋😋
Ingredients...
*Dessicated Coconut... 2 Cup
1 Cup...100ml
*Milk.. 2 Cup
*Sugar... 1/2 Cup .
*Cashew nuts Powder... 1 tbspn... optional
*Green Cardamom Powder...1/4 tsp
For rolling...
*Orange & Green food colour...less than a pinch... optional
*Dessicated Coconut...3/4 th Cup
Method...
*In a thick based Pan or Kadhai add Dessicated Coconut ,Milk and Sugar. Mix properly and keep it aside for 15 minutes.
* Now put this mix on Gas, on medium flame. Keep stirring, take care it should not stick to the bottom.
*Cook till it becomes a soft sticky dough.
Check by rolling a small Ladoo.
It took me approximately 20 minutes. Switch off the Gas.
* Add Cashew Powder, and green Cardamom Powder. Mix properly.
*Divide this in 3 equal parts.
In one part add little Orange colour, mix well.
In another part add little Green colour, mix well.
Third part should be white.
*Roll out small Ladoos and roll them in dessicated Coconut powder.
*Enjoy...😋😋😋😋
Note...1) You can adjust Sugar as per your requirement.
2) Refrigerate for longer shelf life.
Eat at Normal room temperature.
#रेणूरसोई
#नारळ #काजू #लाडू
नारळाचे लाडू
नारळाचे लाडू अतिशय झटपट होतात व सुमधूर लागतात.
फार गोड नसल्यामुळे खायला पण मजा येते...
साहित्य...
*डेसिकेटेड कोकोनट...2 वाटी
1वाटी...200 मिली
*दूध... 2 वाटी
*साखर... 1/2 वाटी
*काजू पुड... 1 टेबलस्पून... ऐच्छिक
*वेलदोडे पूड... 1/4 टीस्पून
लाडू वळण्यासाठी
*डेसिकेटेड खोबरे कीस... 3/4 वाटी
*खायचा केशरी व हिरवा रंग... एका चिमूट पेक्षा कमी...ऐच्छिक
कृती...
*खोबरे कीस, दुध व साखर एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत छान एकत्र करून 15 मिनिटे मुरत ठेवा.
* पंधरा मिनिटांनी गॅस वर मध्यम आचेवर ठेवून हलवत रहा. तळाला लागुन चिकटू नये याची काळजी घ्या.
* छान चिकट गोळा होईपर्यंत शिजवावे. मला अंदाजे 20 मिनिटे लागली. एक छोटीशी गोळी घेऊन लाडू वळुन पहा.
* गॅस बंद करून, त्यात काजू पुड व वेलची पूड घालून छान एकत्र करा.
* सारखे तीन भाग करून घ्या.
एका भागात अगदी थोडा खाण्याचा हिरवा रंग घालून छान एकत्र करा.
दुसऱ्या भागात अगदी थोडा खाण्याचा केशरी रंग घालून छान एकत्र करा.
तिसरा भाग पांढरा च राहू द्या.
*आता छोटे छोटे गोल लाडू वळून खोबरे किसात घोळुन घ्या.
*स्वादिष्ट मऊ लुसलुशीत लाडुंचा आनंद घ्या.
टिप...
1) साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार जास्त घेऊ शकता.
2) फ्रीजमध्ये ठेवावे. खाताना आधी बाहेर काढून ठेवा.
Comments
Post a Comment