#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#रेणुरसोई
#सिझलर
#वेजी #सिझलर
डिसेंबरच्या थंडगार वातावरणात प्रत्येकाला गरमागरम आणि सिझलिंग म्हणजेच वाफाळते पदार्थ खाणे आवडते...
आज काल आपल्याला सगळ्यांना सिझलर खावेसे वाटते .... आमच्या घरी पण सर्वांनाच सिझलर आवडते ... परंतु रेस्टॉरंटमध्ये नाही ....
प्रत्येकाला घरी केलेले चवदार स्वादिष्ट सिझलर आवडते ... 😋😋😋
घर मस्त सिझलर च्या चुरचुरीत आवाजाने व सुगंधाने भरून गेले आहे, प्रत्येकजण जेवणाची आतुरतेने वाट पाहत आहे 😃😃😃
चला आज पाहूया घरी सिझलर कसे तयार करावे ...
हे प्रमाण 4 ते 5 व्यक्तींसाठी आहे...
कृती...
साहित्य
कटलेटसाठी ....
* मूग डाळ ... १ कप
* उकडलेले आणि मॅश/कुस्करलेला बटाटा ... १ कप
* हिरव्या मिरची .....4
* चिरलेले आले ... १ टिस्पून
* लसूण पाकळ्या....4
* भाजलेल्या पोह्याची पुड ... १/२ कप
* मीठ ... १ टीस्पून
* काळी मिरी पावडर ... १/२ टीस्पून
* तेल ... तळण्यासाठी
* मूग डाळ 1 तास भिजवून ठेवा.
* नंतर मुग डाळ, हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण पाकळ्या घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. पाणी घालू नका.
* हे मिश्रण एका पॅनमध्ये घालावे, मीठ, काळी मिरी पावडर, मॅश बटाटे व्यवस्थित मिक्स करावे, त्यात मिश्रण थोडे घट्ट करण्यासाठी भाजलेल्या पोह्याची पुड घाला.
* लहान लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा, आपल्या आवडीनुसार आकार द्या आणि गोल्डन कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळणे.
* बाजूला ठेवा.
मटार भात
* तांदूळ ... १ कप
* हिरवे वाटाणे .. १ कप
* पाणी ... 3 कप
* मीठ ... एक टीस्पून
* तेल ... 1 टेबलस्पून
* तांदूळ व्यवस्थित धुवा.
कढईत तेल गरम करून त्यात हिरवी वाटाणे आणि तांदूळ घाला, मध्यम आचेवर 3 मिनिटे परतावे, मीठ आणि 3 cup कप पाणी घाला.
* पाणी आटेपर्यंत झाकण न ठेवता शिजवा. गॅस बंद करा.
* आपला भात तयार आहे, झाकून ठेवा.
टोमॅटो ग्रेव्हीसाठी ...
* लाल टोमॅटो चिरलेला..3 कप
* चिरलेला कांदा ... १/२ कप
* लसूण ... 2 पाकळ्या
* किसलेले आले ... १/२ टीस्पून
* तेल ... 1 टीस्पून
* गव्हाचे पीठ ... १ टिस्पून
* तूप ... २ चमचा
* हळद ... १/4 टीस्पून
* लाल तिखट ... १ टीस्पून
* साखर ... 3 टीस्पून
* मीठ ... १/२ टीस्पून
*टोमॅटो, आले आणि लसूण मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्या.
* स्टेनलेस स्टील कढईमध्ये १ चमचा तेल आणि बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत परतावा.
* हळद, लाल तिखट, गव्हाचे पीठ घालून मंद आचेवर २ मिनिटे परता.
* टोमॅटो मिश्रण, साखर, मीठ, मिक्स करावे. ग्रेव्ही चे मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत शिजवा.
* तूप घाला आणि गॅस बंद करा.
भाज्यांसाठी ...
* पानकोबी पाने ... 5..6
* फुलकोबी चे तुरे ... 2 कप
* कोवळ्या फ्रेंच बीन्स ... 20
* गाजर फिंगर/सळी आकारात कापले ... 2 कप
* हिरवे वाटाणे ... १ कप
* बटाटा फिंगर/सळी आकारातील ... २ कप
* मोठ्या कढईत, थोडेसे पाणी उकळवा, चाळणी ठेवा आणि पानकोबीची पाने वगळता सर्व भाज्या वाफवून घ्याव्यात.
* बटाटा फिंगर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.
* सर्व भाज्या बाजूला ठेवाव्यात.
सिझलर प्लेटिंग ...
* गॅसवर 15 मिनिटे सिझलर प्लेट गरम करा.
* ही गरम प्लेट त्याच्या लाकडी तळावर ठेवा, पानकोबीची पाने झटपट व्यवस्थित लावा, नंतर मटरभात, कटलेट, सर्व उकडलेल्या भाज्या, बटाट्याचे फिंगर ठेवा आणि शेवटी ग्रेव्ही ओता.
ग्रेव्ही फक्त कटलेट भाता वरच घालायची आहे.
*सिझलिंग करण्यासाठी ...
१/२ कप बर्फाच्या पाण्यात २ टिस्पून तेल एकत्र करावे, प्लेटच्या चारी बाजूने तेल पाण्याचे मिश्रण सोडावे सुंदर चुरचुरीत आवाज व वाफा येणे सुरू होते.
मस्त गरमागरम सिझलर चा आनंद घ्या ...
टिप... घरी जर सिझलर प्लेट नसेल तर ,एका मोठ्या तव्यावर सांगितले तसे करावे व मग त्यावरून प्रत्येकाच्या बशीत वाढवून द्यावे. अगदी खालचे पान कोबीचे पान सुद्धा चवदार लागते.

Comments
Post a Comment