#RenuRasoi #Aluchi Vadi #Steamed #Colocasia #Leaf #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot. Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi. It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...
रेणूरसोई
अमृतसरी दाल माखनी
हिवाळा आला की छान गरमागरम व पौष्टिक असे खावेसे वाटते.
जठराग्नी मस्तपैकी प्रज्वलित झाला असल्यामुळे खाल्लेले पचते व आवडते. या ऋतूत उत्तम पौष्टिक खाऊन पुढील ऋतूसाठी शरीर तयार करायचे असते.☺️☺️
अशा छान गुलाबी थंडीत मस्त भरपूर आलं, साजूक तूप व मलई घालून केलेली ही दाल व गरमागरम रोटी फार सुंदर लागते.
सोबतीला छान भरपूर गाजर, मुळा ,कांदा, टमाटा व घरी केलेले आंब्याचे लोणचे बढिया मेनू होतो😋😋😋
तर आज बघूया अमृतसरी दाल माखनी...
साहित्य...
*काळी उडदाची डाळ... एक वाटी

1 वाटी... 150 मिली
*कांदा चिरून... एक वाटी
*आले किस... दोन टीस्पून
*टमाटे चिरून... दीड वाटी
*लसुण पाकळ्या... चार
*हिरव्या मिरच्या...चार
*गरम मसाला... पाव टी स्पून
*हळद...अर्धा टीस्पून
*लाल तिखट... 1 टिस्पून
*मीठ.... 1.5 टिस्पून
*आमचूर पावडर... एक टीस्पून
*घरची घोटलेली साय... अर्धी वाटी
*तेल... 3 टेबलस्पून
*साजूक तूप... एक टेबलस्पून
*जिरे... पाव टिस्पून
*धनेपूड... एक टिस्पून
*कोथिंबीर चिरून... एक टेबलस्पून
कृती...
*उडीद डाळ स्वच्छ धुऊन तीस मिनिटे भिजत घाला.
*नंतर ती डाळ कुकरमध्ये घालून त्यात अडीच वाटी पाणी, अर्धी वाटी कांदा, एक टीस्पून आले घालून मध्यम आचेवर दोन शिट्ट्या होईपर्यंत, नंतर पाच मिनिटे मंद गॅसवर शिजवून घ्या.

*कुकर गार झाल्यावर डावाच्या साह्याने उत्तम पैकी घोटून घ्या गरज वाटल्यास एक वाटी पाणी घालू शकता.
* हिरवी मिरची , उरलेले आलेकिस व लसूण पाणी न घालता वाटून घ्या.
*नंतर एका कढईत तेल व तूप घालून जिरे घाला, जिरे तडतडल्यावर उरलेला अर्धी वाटी कांदा घालून मऊ होईपर्यंत परता.
*मग त्यात आले, मिरची व लसूण यांचे वाटण घाला व खमंग होईपर्यंत परता.
*मग हळद, तिखट, धने पूड घालून छान एकत्र करा.
*चिरलेले टमाटे घालून बाजुने तेल सुटे पर्यंत परतून घ्या.
*नंतर घोटलेली डाळ घालून छान एकत्र करून हवे असल्यास थोडे पाणी घालून तीन-चार मिनिटे उकळा. ही डाळ थोडी घट्टच छान लागते नंतर त्यात घरचा गरम मसाला, आमचुर व मीठ घालून छान एकत्र करून घ्या.
*गॅस बंद करा वाढायच्या आधी घरचीच दुधावरची साय छान घोटून घालून मग वाढा.
*ही डाळ गरम गरमच छान लागते.
*वरून कोथिंबीर घालून पोळी सोबत वाढा.
टिप...
आमचूर पावडर घरी नसल्यास दोन टी स्पून चिंचेचा कोळ घालू शकता.
गरम मसाला रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर मिळेल...
http://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html?m=1

Comments
Post a Comment