Skip to main content

Chirote

 


#रेणूरसोई

चिरोटे

घरोघरी दिवाळीत बनणारा पारंपारिक पदार्थ आहे....

उत्तम चिरोटे हलके व  खुसखुशीत तर हवेतच पण ते खाल्ल्यावर तोंडात तुपकटपणा यायला नको... छान सगळे पदर सुटले पाहिजेत त्याच्यावरच हलकाच असा साखरेचा गोडवा....😋😋😋 खुप सुंदर लागतात असे चिरोटे👍

उत्तम चिरोटे व्हावेत म्हणून भरपूर टिप दिल्या आहेत...

साहित्य... 

*मैदा... 3 वाटी

1 वाटी...150 मिली.

*रवा... 2 टेबलस्पून

मोहन म्हणून

*तुप...पातळ व गरम करून...3 टेबलस्पून

*मीठ....चिमुटभर 

*साखर... 2 वाटी

*लिंबू रस...1 टिस्पून

पोळी वर लावण्यासाठी...

*पातळ साजूक तुप...  6 टेबलस्पून

*मैदा...4..5टिस्पून

*साजूक तुप... तळण्यासाठी

*केशरी रंग... चिमुटभर/थोडा... ऐच्छिक

कृती...

*मैदा,रवा, व मीठ छान एकत्र करून घ्या नंतर त्यात पातळ तूप कडकडीत गरम करून घाला. छान मिसळून घ्या.

*त्यातील एक वाटी पीठ बाजूला काढा व उर्वरित पीठ हळू हळू पाणी घालून छान घट्ट भिजवून घ्या. 1 वाटीपेक्षा थोडे कमी पाणी लागले मला.

*बाजूला काढलेले एक वाटी पीठ थोडासा केशरी रंग घालून छान एकत्र करा व अतिशय कमी पाणी घालून घट्ट भिजवून घ्या.

*दोन्ही भिजवलेले पीठ झाकून 30 मिनिटे मुरू द्या.

*मग पांढऱ्या पिठाचे 4 एक सारखे भाग करा. केशरी पिठाचे दोन भाग करा.

*दोन पांढऱ्या पिठाच्या पोळ्या शक्य तितक्या पातळ लाटून घ्या व एक केशरी पोळी पण पातळ लाटून घ्या.

*सर्वप्रथम एक पांढरी पोळी पोळपाटावर ठेवा त्याच्यावर तीन ते चार टिस्पून पातळ तूप हाताने पसरून पुर्ण पोळी वर कोरडा मैदा भुरभुरा/घाला.... पुन्हा हाताने पसरवून त्यावर केशरी पोळी ठेवा. त्याच्यावर तीन ते चार टिस्पून पातळ तूप हाताने पसरून पुर्ण पोळी वर कोरडा मैदा भुरभुरा/घाला.... पुन्हा हाताने पसरवून त्यावर पांढरी पोळी ठेवावी.त्याच्यावर तीन ते चार टिस्पून पातळ तूप हाताने पसरून पुर्ण पोळी वर कोरडा मैदा भुरभुरा/घाला.... हाताने पसरवून या तिन्ही पोळींचा घट्ट रोल करून घ्या.

रोल एकसारखा करून घ्या.

दोन्ही बाजूंनी छोटे तुकडे कापून घ्या.

उरलेल्या रोल चे एकसारखे 12 तुकडे सुरीने कापून घ्या. एका भांड्यात झाकून ठेवावे.

*अशाच प्रकारे दुसरी पोळी पण करून, रोल करून तुकडे करून घ्यावेत.

*मग कापलेली केशरी पांढरी बाजु वर येईल असे पाहून 3 ते 4 इंचाची एकसारखी पुरी लाटून घ्या. फार पातळ नको.... नाही तर पदर सुटणार नाहीत.

*लोखंडी कढईत तुप तापवून, मंद आचेवर तुपात एका वेळी दोन किंवा तीन असे गुलाबी रंगावर तळून घ्या.

मंद आचेवर तळल्यामुळे आतुन पुर्ण पदर सुटतात.

* अशा प्रकारे पुर्ण चिरोटे तळून घ्या.

पाक करण्यासाठी....

*एका जाड बुडाच्या कढ‌ईत किंवा पातेल्यात साखर घालून साखर बुडेल एवढे पाणी घाला.

मध्यम आचेवर सतत ढवळत रहा. साखर विरघळल्यावर पाकाला उकळी येईल तेव्हा घड्याळात वेळ पाहून घ्या व उकळी आल्यावर आठ ते दहा मिनिटे झाली की गॅस बंद करावा. लिंबू रस घालून छान एकत्र करून घ्या.

*लगेचच तळलेले 3...4 चिरोटे घालून दोन्ही बाजूंनी पाक लागल्यावर  चिमट्या च्या साह्याने बाहेर काढून एका मोठ्या ताटात ठेवा. पुन्हा दुसऱ्या चिरोटे घाला. 

*अशा प्रकारे सगळे चिरोटे पाकातून घालून ताटात पसरवून  ठेवा एक दीड तासात छान कोरडे होतात. 

*घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवा सात आठ दिवस छान राहतात.

टीप...

1)कॉर्नफ्लोअर किंवा तांदूळ पीठ तुपात कालवून पण पोळीवर पसरवतात पण असे केल्याने  तुपकट चव येते व तळताना पीठ सुटून तूप जळते.

2) साजूक तूप न वापरता सनफ्लॉवर तेलात तळले तरी चालेल.

3) पाक न करता गरम चिरोट्यांवर भरपूर पिठीसाखर घालून पण करता येतात.

4) कधी कधी एक तासात सुकले नाही तर बऱ्याच वेळा नंतर सुकतात.

5) जर पाक जास्त घट्ट होऊन साखर जमली तर  एक-दोन टिस्पून पाणी टाकून पुन्हा गरम करून घ्या.Comments

Popular posts from this blog

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po

Chakali

#RenuRasoi Chakali The name Chakali is very well associated with the festival Diwali. Chakali is prepared in every household of Maharashtra. Every one has there own Recipe and method of preparation. Chakali should be crispy 😋 and full of flavour. Following Recipe is 100% success full, if all the steps followed carefully. Ingredients... For Bhajani... *Rice...1kg *Split Chickpea Dal..1/2kg *Split Black Gram Dal...250 grams *Coriander seeds...1/2 cup *Cumin seeds...1/4 Cup Method for Bhajani... *Wash Rice and both the Dal separately. *Sun dry the Dal, Rice should be dried in home only. *Roast all the ingredients seperately on low flame. *The correct way of roasting is , while roasting take some grains in your hands, if they are too hot to hold, it is done. *Roast Coriander Seeds n Cumin seeds for 2..3 minutes only. *Let it cool, grind it from the flour mill. *You can use this flour in other Recipes too. *It has a shelf life of 3 months in dry weather conditions.

Soft Dosa

#रेणूरसोई #झटपट #दोसा सकाळच्या घाईच्या वेळेत, स्वयंपाक व नाश्ता हे दोन्ही आटपून 9 वाजता ऑफिससाठी घराबाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरत😊. त्यात माझा दिवसाची सुरुवात होणारा नाश्ता हा पोषक असावा ह्या गोष्टीवर भर असतो. मग अशावेळेस खुप युक्ती लढवाव्या लागतात. आज त्यातीलच एक चवदार प्रकार... खमंग दोसा...बिना चटणीचा तरी चवदार... लोखंडी तवा वापरून हि पटकन होणारा... झटपट दोसा... साहित्य... जाड तांदुळ..3 वाटी उडीद डाळ...1 वाटी मेथीदाणा...1 tsp मीठ.... 3.5 tsp जाड पण तिखट हिरवी मिरची ..4,5 खोबरेल तेल...1/2 वाटी कृती.... तांदुळ, डाळ स्वछ धुवून व मेथीदाणे घालुन 4..5 तास भिजवा. मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या, फार पातळ वाटु नका. रात्रभर आंबवुन घ्या. सकाळी त्यात मीठ घालून, मिक्स करा, गरज वाटली तर 1 वाटी पाणी घालून पातळ करा. गॅसवर स्वच्छ घासलेला लोखंडी तवा 5 मिनिटे तापवत ठेवा. गॅस कमी करून , त्यावर 2 tsp तेल पसरवून अजून 3 मिनिटे तापवा. आपला तवा दोसे करायला सिद्ध झाला. तवा मंद गॅसवर करा, 2..3 थेंब तेल घालून पसरवा, 2 मोठे चमचे भरून पीठ घाला, झटपट गोल पसरवा. खुप पातळ नको, जाडसर ठेवा.