#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#रेणूरसोई
कारल्याची भाजी...३
कारल्याची ही भाजी खुप छान लागते.
अगदी लहान मुलांना सुद्धा आवडते...
मुख्य म्हणजे कारले शिजुन कमी होतात...पण ही भाजी मात्र वाढते व सर्वांना पुरते...
ही भाजी पोळी किंवा भाकरी सोबत खुप छान लागते. सोबत कच्चा कांदा मात्र जरूर हवा.
साहित्य...
*कारले... एक पाव
*तुरीची डाळ...अर्धी वाटी
*हळद...पाव टीस्पून
*मीठ...एक टीस्पून
*साखर...दोन टीस्पून
*तेल... पाच टेबलस्पून
*मोहरी...पाव टीस्पून
*गोडा मसाला.. अर्धा टीस्पून
*तिखट...एक टीस्पून
*हिंग...पाव टीस्पून
*लिंबूरस...दोन टीस्पून
कृती...
*प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन एक वाटी पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर घोटुन घ्या.
*कारले स्वच्छ धुऊन पातळ चकत्या करून त्यांना व्यवस्थित मीठ चोळुन 15 मिनिटे ठेवावे.
*पंधरा मिनिटांनी कारल्याच्या चकत्या घट्ट पिळून घ्या. उरलेला रस वापरु नये.
*एका लोखंडी कढईत तेल तापवून त्यात मोहरी घालून तडतडल्यावर हिंग घालून कारल्याच्या चकत्या घालून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.
*मग त्यात साखर, तिखट व गोडा मसाला घालून छान एकत्र करा.
* शिजवुन घोटलेले वरण घालून छान एकत्र करून 5 मिनिटे परतावे.
*गॅस बंद करून लिंबू रस घालून एकत्र करा.
*कोथिंबीर घालून सजवा.
*ही भाजी पोळी किंवा भाकरी सोबत खुप छान लागते. सोबत कच्चा कांदा मात्र जरूर हवा.

Comments
Post a Comment