#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#रेणूरसोई
कारल्याची भाजी...कोकणी पद्धतीची
कारल्याची हे कोकणी पद्धतीची भाजी खूप सुंदर लागते.
हिला कारल्याची भुत्ती असे म्हणतात.
करायला अतिशय सोपी व चटपटीत अशी ही भाजी आहे.
मुख्य रेसिपीत मी थोडे फार बदल केले आहेत.
भाजी तळून न घेता परतून घेतली आहे व बिया आणि साले पण काढले नाही आहेत.
ही भाजी वरण-भात किंवा पोळी सोबत पण छान लागते.
साहित्य
*कारले... एक पाव
*कांदे चिरून... एक वाटी
*ओल्या खोबऱ्याचा कीस...एक वाटी
*धने...तीन टीस्पून
*लाल मिरच्या... 10 किंवा
*लाल तिखट 2 टीस्पून
*चिंच... आवळ्या एवढी
*मेथी दाणे... सात..आठ
*मीठ... एक टीस्पून
कृती...
*कारले स्वच्छ धुऊन पातळ चकत्या करून घ्या व मीठ चोळुन पंधरा मिनिटे मुरु द्या. नंतर दोन्ही हातांनी घट्ट पिळून कडू रस काढून टाका. फक्त पिळलेल्या फोडीच वापरायच्या आहेत
*धने व मेथी एक टीस्पून तेलात परतून घ्या. ओले नारळ, धने, मेथी, व चिंच मिक्सर मधून पाणी न घालता वाटून घ्या.
*नंतर एका कढईत तेल तापवून कारल्याच्या फोडी छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या *लगेच त्यात कांदा घालून तीन मिनिटे परतून घ्या.
* वाटलेला मसाला पण कढईत घालून तीन-चार मिनिटे खमंग परता. आपली भाजी तयार आहे . गॅस बंद करा.
* वरण भातासोबत किंवा पोळीसोबत पण खूप छान लागते.

Comments
Post a Comment