#RenuRasoi #Aluchi Vadi #Steamed #Colocasia #Leaf #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot. Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi. It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...
#रेणूरसोई
कुरकुरीत चाट
चाट हा प्रकार अतिशय चटपटीत व सगळ्यांना च आवडणारा प्रकार....
हा चाट चा प्रकार चटपटीत व कुरकुरीत असला तरी अजिबात तेलकट नाही...
तुम्ही हा प्रकार घरी नाश्त्या ला, पार्टीसाठी, स्टार्टर म्हणून कशाप्रकारे पण करू शकता.
साहित्य...
*ब्रेड....12 स्लाईस
*साजुक तूप...1/4 वाटी
*उकडलेला बटाटा... सोलुन व छोटे तुकडे करून...2 वाटी
*उकडलेला मका/ स्वीटकॉर्न...1 वाटी
*शेंगदाणे...एक टिस्पून तेलात कुरकुरीत होईपर्यंत परतून...1/2 वाटी
*डाळींब दाणे...1/2 वाटी
*कांदा बारीक चिरून...1/2 वाटी
*कोथिंबीर बारीक चिरून...1/4 वाटी
*घरी केलेला मसाला...2 टिस्पून
*चिंच चटणी...1/4 वाटी
कृती...
*ब्रेड वाटी च्या सहाय्याने गोल कापून, लाटण्याने लाटून घ्या. आप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तुप घालून, ब्रेड चे गोल तुकडे छान दाबुन बसला, मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत अथवा खालुन गुलाबी रंगावर भाजून घ्या.
किंवा
*ब्रेडचे तुकडे करुन, तव्यावर दोन्ही बाजूंनी तुप लावून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
*उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, कांदा, स्विटकॉर्न, तळलेले शेंगदाणे, मसाला, कोथिंबीर व चिंचेची चटणी सगळे छान एकत्र करून घ्या.
*ब्रेडच्या कुरकुरीत वाटी किंवा तुकड्यांवर ठेवून, डाळींब दाणे घालून लगेच सर्व्ह करा.
*चिंच चटणी...
चिंच कोळ, गुळ, धनेपूड व मीठ घालून छान एकत्र करून घ्या. उरलेली चटणी काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून रोजच्या भाजी व आमटी त पण वापरू शकता.
*मसाला...
लाल तिखट... एक टिस्पून, मीरेपुड...अर्धा टिस्पून, भाजलेले जिरे पूड...अर्धा टिस्पून, काळे मीठ... एक टिस्पून, सुंठ पुड... अर्धा टिस्पून.
सगळे छान एकत्र करून घ्या. उरलेला मसाला डब्यात भरून ठेवा.

Comments
Post a Comment