Skip to main content

Green chilli pickle

  #RenuRasoi  #Spicy #Tangy #Quick Chilli Pickle   Mirachi ka achar/pickle.    This is a quick achar. ...which goes on finishing quickly. Ingrediants. .. *Fresh green chillies... 125 gms *Mustard seeds.. 1.5 tsp *Fenugreek seeds...1/4 tsp  *Lemon juice....2 tbspn *Turmeric powder... 1/4th tsp *Asafoetida powder... 1/4 tsp *Salt... 1 tsp *Oil... 2 tbspn  Method. .. *Cut chilles lengthwise and then again cut in two parts, we have used non spicy chillies specially available in winter.  *Add 1 tsp salt & lemon juice, and mix properly.  *Make a coarse powder of Fenugreek seeds and Mustard seeds. *Heat oil in a small kadhai or pan, add Fenugreek and Asafoetida powder. Switch off the gas. Immediately add Turmeric powder. Let it cool. *Add Mustard seeds powder in the Oil. *Add this in Chilli,  mix properly. *Let it marinate for 30 minutes. *Our pickle is ready to eat. *Refrigerate for longer shelf life. *We want crispy chillies. so we always prepare this way. *Enjoy. #रेणूरसोई #मिरची लोणचे

Wheat flour Nankatai


#RenuRasoi
#Nankatai
    Generally it is prepared by using Maida....but in this recipe I have used Wheat flour n Besan/ Chickpea flour.
    It may not give super looks  but it  tastes Awesome. ..n healthy too...
No baking powder or Soda is used.
You can cook it on your Gas top also. No need of oven.
Here I have cooked it on Gas top.
Ingredients...
*Wheat flour...1.5 Cup
1 Cup...150 ml
*Chickpea/Besan flour...1/2 Cup
*Powdered Sugar...1 Cup
*Homemade Ghee...3/4 th Cup
*Vanilla Essence...1/4 tsp...optional
Or
*Green Cardamom Powder...1/4 tsp.
* Chopped Dry fruits or Tutti Frutti..1 tbsp
Method...
*Mix Wheat flour & Chickpea/Besan flour properly.
*Add  powdered Sugar Homemade Ghee.
*Add Vanilla Essence or Green Cardamom Powder.
*Mix all with gentle hands.
*Make 15...16 balls...decorate with Nuts or Tutti Frutti.
*Place these balls in a greased baking dish.
*Bake in the preheated oven at 180 degrees for 15 mts or till slight golden brown.
*If cooking on a gas top, take a heavy bottomed pan, spread 2 Cups Salt.
*Place the baking dish with Nankatai...cook on low flame till golden brown.
*Initially they may be soft but will be crispy when cool.
*Store in an Airtight container.
Enjoy...

#रेणूरसोई
#नानकटाई
आपण बाजारातून आणतो ती नानकटाई मैदा व डालडा घालून केलेली असते.
आज आपण घरीच कणिक व बेसन घालून खमंग अशी नानकटाई केली आहे.
यामध्ये आपण कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा बेकिंग पावडर व सोडा इत्यादी घातले नाही आहे.
तुम्ही ही ओव्हनमध्ये करू शकता किंवा गॅस वर  पण बनवू शकता.
मी आज गॅस वरती केली आहे.
साहित्य...
*गव्हाची कणीक... 1 वाटी
1 वाटी...150 मिली
*बेसन ...1/2 वाटी
*पिठीसाखर...1 वाटी
*साजूक तुप...3/4 वाटी
*व्हॅनिला इसेन्स ...1/4 टीस्पून किंवा
*वेलदोडा पावडर...1/4 टी स्पून
*काजू बदाम तुकडे किंवा टुटीफ्रुटी...1 टेबलस्पून
कृती...
*कणीक व बेसन नीट कालवून एकत्र करा.
*पिठीसाखर, तुप  व व्हॅनिला इसेन्स किंवा वेलदोडे पूड घाला.
*सगळं हलक्या हाताने एकत्र करा.
*एक सारखे पंधरा-सोळा  आकाराचे गोळे करा.
वरून सुकामेवा किंवा टुटी फ्रुटी लावा.
* हे गोळे तुप लावलेल्या बेकिंग डिश किंवा पसरट अॅल्युमिनियम च्या भांड्यात ठेवा.
*आधीच गरम केलेल्या ओव्हन मध्ये 180°वर पंधरा मिनिटं किंवा सोनेरी गुलाबी रंगावर भाजून घ्या.
*जर गॅसवर करणार असाल तर एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत दोन वाट्या मीठ पसरवून घ्या पाच मिनिटे गरम करून घ्या मग त्यात  नानकटाई चे भांडे ठेवा.
मंद गॅसवर सोनेरी गुलाबी रंग येईस्तोवर भाजून घ्या.
*बाहेर काढून घ्या सुरुवातीला थोड्या म‌उ वाटतील पण गार झाल्यावर छान खुसखुशीत होतात.
*एअरटाईट डब्यात भरून ठेवा.








Comments

Popular posts from this blog

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Ravan Pithale रावण पिठले

  रावण पिठले #रेणूरसोई मस्त पैकी थंडी पडली आहे... अशा वेळी काही तरी चमचमीत व झणझणीत खावेसे वाटते... तेंव्हा हे चमचमीत झणझणीत रावण पिठले करून पहा... अतिशय चवदार चविष्ट झाले आहे, तिखट मात्र नक्कीच आहे... ज्यांना फार तिखट आवडत नाही त्यांनी छोट्या वाटी ने करुन पहा... मस्तच लागते... साहित्य... सगळे साहित्य एकाच वाटीने घ्यायचे आहे. मी एक वाटी 150 मिली घेतली होती. *बेसन ...एक वाटी *पाणी...अडीच वाटी *शेंगदाणे तेल... एक वाटी *लाल तिखट.... एक वाटी  *मीठ ...अडीच टिस्पून *हळद.... एक टीस्पून  *चिरलेला कांदा... एक वाटी वरपर्यंत भरून  *खोबरे कीस... एक वाटी *मोहरी व जिरे... अर्धा टीस्पून प्रत्येकी *लिंबू... 1/2 कृती... *बेसन मध्ये दोन वाटी पाणी हळूहळू घालून कालवून घ्या. गुठळी होऊ देऊ नका. *एका जाड बुडाच्या कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घालून ते, तडतडल्यावर हळद व कांदा घालून कांदा थोडा मऊ होईपर्यंत परता.  *मग तिखट घालून दोन मिनिट परतावे. *नंतर त्यात खोबरे कीस व मीठ घालून छान एकत्र करा ,मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत खमंग परतावे. *नंतर बेसन व पाणी यांचे मिश्रण घालून, बेसन कालवलेले भांडे पुन्हा अर्धी वाटी पाणी

Bhel... Recipe in Marathi

   #रेणुरसोई #भेळ भेळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच... अनेक चवदार, चटपटीत पदार्थांचे संमेलन म्हणजे भेळ.... थोडी कुरकुरीत, आंबटगोड, तिखट... ट्टाॅक 😋😋😋😋😋 आमच्या घरी तर रविवारी संध्याकाळी जेवण न करता भेळ केली तरी चालते....  या भेळे साठी लागणारी शेव, बुंदी, पापडी सर्व काही घरीच केले आहे...  साहित्य....  *मुरमुरे ... 6 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गाठी पापडी... 1 वाटी  *शेव... 1 वाटी  *खारी बुंदी... 1/2 वाटी  *शेंगदाणे... 1/2 वाटी  *उकडून चिरलेले बटाटे... 1 वाटी  *चिरलेला कांदा...1/2 वाटी  * चिरलेली कोथिंबीर... 3 टेबलस्पून  *हिरवी चटणी.... 1/2 वाटी  *चिंचेची चटणी... 1 वाटी  *मीठ आणि तिखट.... आवडीनुसार  कृती....  *कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात शेंगदाणे घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे.  त्यांना बाजूला ठेवा, गार होऊ द्या.  *मुरमुरे, उकडलेले बटाटे, 1/4 वाटी चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, 1/2  वाटी प्रत्येकी शेव, पापडी, बुंदी, तळलेले शेंगदाणे, 1 चमचा हिरवी चटणी, 3 चमचे चिंचेची चटणी, तिखट आणि मीठ घालून छान एकत्र करावे.    तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्य घालून करा.  * सर्व्ह करताना