#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#रेणूरसोई
#चित्रान्न भात #रावणभात
विदर्भात चंद्रपूर जिल्ह्या ला लागुनच आंध्र प्रदेशाची सीमा आहे... त्यामुळे तेलगु जेवण शैली चा प्रभाव येथील आहारामध्ये आहे.
घरी काही मोठं कार्य असेल तर जे स्वयंपाक करायला तेलंगणा भागातील स्वयंपाकी येतात त्यांना "अय्या" असे म्हटले जाते...
तर उत्तरेकडील स्वयंपाकी असतील तर "महाराज" किंवा "पंडित जी"...
चित्रान्ना भात किंवा रावण भात हा लहान पणापासून खात आलो आहे. अतिशय चवदार लागणारा हा भात गार च खाल्ला जातो व अतिशय अप्रतिम लागतो.
हा भात विशेष करून उन्हाळ्यात कैरी घालून करतात... एरवी वर्षभर पण लिंबू रस केला जातो...
अन्ना म्हणजे भात...
हा भात सकाळी करून संध्याकाळी खाल्ला तर सगळे मसाले मुरल्यामुळे जास्त चविष्ट लागतो.
आज पाहु या अतिशय चवदार चविष्ट असा चित्रान्न भात
साहित्य...
साहित्य ...
* तांदूळ .... 1 वाटी
* शेंगदाणे ... 2 टेबलस्पून स्पू
* काजू ... 5.. ऐच्छिक
* कैरी किसून... 2 टेबलस्पून
* फुटाण्याच्या डाळ्या .... 2 टेबलस्पून
* सुके खोबरे कीस...1/4 वाटी
* उडीद डाळ ... 1 टीस्पून
* पांढरे तीळ...1 टीस्पून
* हिरव्या मिरच्या ... ..4.... मोठे मोठे तुकडे करून
* सुक्या लाल मिरच्या ... 4 ...तुकडे करून
* किसलेले आले ... 1 टीस्पून
* हळद पावडर ... 1/4 टीस्पून
* हिंग पावडर ... 1/4 टीस्पून
* कढीपत्ता ... 25 पाने
* मीठ ... 1 टीस्पून
* साखर...2 टीस्पून
* तेल ... 4 टेबलस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
पद्धत ...
* तांदूळ स्वच्छ धुवून एका जाड बुडाच्या भांड्यात घालून 3 वाटी पाणी घालून, गॅसवर मंद आचेवर शिजवुन घ्या. भात शिजवताना झाकण ठेवू नये.अशा प्रकारे शिजवावे की प्रत्येक शीत वेगळे पाहिजे. पूर्णपणे गार होऊ द्या.
* एक टेबलस्पून तेलात शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या, बाजूला काढून ठेवा.
त्याच तेलात काजू गुलाबी होईपर्यंत तळून घ्या.
*कढईत तेल गरम करून त्यात मोहरी ची फोडणी झाल्यावर, पांढरे तीळ, उडीद डाळ घालून गुलाबी रंगावर परता. फुटाण्याची डाळ घाला, एक मिनिट परता.
* हिंग, हळद, किसलेले आले, हिरवी मिरची, लाल मिरच्या, सुके खोबरे कीस व कढीपत्ता सगळे एका मागोमाग एक घालून, छान व्यवस्थित मिसळा. सगळे एकत्र 2 मिनिटे परता.
* मीठ, कैरी किस,आणि शिजवलेला भात घाला. नीट मिसळा. झाकण ठेवून 3 मिनिटे वाफवून घ्या.
* व्यवस्थित मिसळा, पुन्हा २ मिनिटे परता.
*तय्यार.
*हा भात विशेष करून गार छान लागतो.

Comments
Post a Comment