Skip to main content

Broccoli Almond Soup

  🥦 Broccoli Almond Soup #RenuRasoi #Broccoli #Almond #Soup #Tasty #Homemade This soup is very easy to prepare and tastes yummm 😋 All ingredients are easily available (except broccoli and almonds 🫢). It is a healthy, creamy, and nutritious soup. Very popular for weight management, immunity, and as a light evening meal. Rich in vitamins, good for brain and heart health. High in fiber, helps digestion, and keeps you full longer.   Ingredients *Broccoli florets – 1 cup *Broccoli stems (peeled & chopped) – 1/4 cup *Almonds – 10–12 *Onion (chopped) – 1/4 cup *Garlic – 4 pods *Milk – 1/2 cup *Water – 1 cup *Sugar – 1 tsp *Salt – 1/2 tsp *Black pepper powder – 1/4 tsp *Homemade ghee – 2 tsp *Chopped almonds – For garnish Method *Chop the almonds. *Take a thick-bottom pan, add ghee and let it melt. *Add chopped onion and garlic, sprinkle a pinch of salt. Cover and cook on low flame. *After 2 minutes, sauté well and add broccoli stems. Sauté for a minute. Cover again and cook fo...

कवठाचे पंचामृत

#रेणूरसोई
कवठाचे पंचामृत
आजकाल कवुठ फारशी  मिळत नाही. पण तरी मी वर्षातुन दोन..तिनदा तरी आणायचा प्रयत्न करते. कवुठ औषधी पण आहे.
कच्चे कवुठ चवीला तुरट व आंबट असते.
कच्चे कवुठ आतुन पांढरे असते...तर पिकलेले कवुठ गुलाबी ते तपकिरी रंगाचे असते... पिकलेले कवुठ आंबट असते पण त्याला छान सुगंध येतो व चवदार लागते. कवठाची चटणी व पंचामृत फारच सुंदर लागते.
कवठाचे पंचामृत कसे केले ते पाहू या...
साहित्य..
1 वाटी... 150 मिली 
*पिकलेल्या कवठाचा गर...1.5 वाटी
*गुळ चिरून...1.5 वाटी
*खोबरे कीस...3/4 वाटी
*शेंगदाणे कुट... 1 टेबलस्पून
*तेल...1 टेबलस्पून
*हिरवी मिरची चिरून...3
*हिंग...पाव टीस्पून
*तिखट...1 टीस्पून
*मीठ...1 टीस्पून
*मोहरी...1/4 टीस्पून
*मेथी दाणे...10..12
कृती...
*कवठाचा गर, गुळ, खोबरे कीस व शेंगदाणे हे एकत्र करून, मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटताना एक वाटी पाणी घाला.
*कढईत तेल तापवून, मोहरी ...मेथी घालून फोडणी करा.
*हिंग, हिरवी मिरची चे तुकडे व हळद घालून, वाटलेले मिश्रण घालावे.
* मंद आचेवर 3..4 मिनिटे परतून घ्यावे, 2 वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर दाट होईपर्यंत शिजवून घ्या.
*अधूनमधून चमच्याने मिश्रण वर-खाली ढवळत राहा... म्हणजे तळाला लागणार नाही.
*फ्रिजमध्ये चार पाच दिवस टिकते.
कवठाची चटणी रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल...
https://www.renurasoi.com/2018/12/wood-apple-chutney.html?m=1



Comments