#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Masala #Brinjals
Brinjal Masala when prepared with different combinations of Masala tastes yummy n liked by one and all.
You can prepare it for your daily Meals, when Guests are coming or even as a party Dish too.
Only the care to be taken is proper use of Masala and Oil.
Ingredients...
*Small Brinjals... 250 gms slit into cross..
*Roasted Groundnut Powder...1 tbsp *Coconut Powder...1 tbsp
*Roasted Seasame seeds powder...
1 tbsp
*Onions... 2 chopped
*Grated Ginger....1 tsp
*Garlic cloves...4
*Green Chillies...4
*Coriander chopped...2 tbsp
*Tamarind Pulp ...2 tbsp
*Gooseberry size Jaggery. ..2 tsp *Coriander Seeds Powder...2 tsp
*Cumin Seeds Powder...1/2 tsp
*Red Chilli Powder...1 tsp
*Turmeric Powder...1/2 tsp
*Salt...1 tsp
*Oil...2 tbsp
*Mustard Seeds...1/4 tsp
Method...
*Make a fine paste of chopped Onions, Coriander, Green Chillies, Ginger and Garlic without adding water.
*Heat 1 tbsp Oil in the Kadhai...add slitted Brinjals... saute them till soft n Golden in colour... keep aside.
*Add remaining 1 tbsp Oil in the same Kadhai, add the Mustard Seeds, after it splutters add Onion paste, saute on low flame till Oil is released from the sides of the pan.
*Add Turmeric Powder, Red Chilli Powder, Coriander Seeds Powder, Cumin Seeds Powder...mix properly and cook for 3 minutes.
*Add Coconut, Peanuts and Seasame Seeds powder...mix properly and cook for 2 minutes.
*Add already sauted Brinjals, Tamarind Pulp and Jaggery.cup
*Add 1 cup hot water and cook on low flame for 3..4 minutes.
*Done.
*Serve hot with Roti, Bhakari or Dal Rice...
*Note...All cooking to be done on low flame.
#रेणूरसोई
मसाल्याचे वांगे
मसाल्याचे वांगे अतिशय चवदार आणि खमंग लागतात...😋😋
फक्त मसाला नीट झाला पाहिजे... तुम्ही भाजी रोजच्या जेवण्यासाठी ,विशेष पाहुणे आल्यावर किंवा अगदी पार्टीचा मेनू म्हणून सुद्धा करू शकता...
गरम गरम पोळी, भाकरी, वरण-भात तुप कशासोबतही ही भाजी छान लागते...
बघू या मसाल्याचे वांगे...
साहित्य...
*छोटी हिरवीगार वांगी... एक पाव.
*कांदे...2
*हिरवी मिरची... चार
*लसूण पाकळ्या... 4
*आले किस...1 टी स्पून
*कोथिंबीर चिरून... दोन टेबल स्पून *भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट... एक टेबलस्पून
*खोबर्याचा किस ...एक टेबल स्पून
*भाजलेल्या तिळाचा कुट...1 टेबल स्पून
*चिंचेचा कोळ ...दोन टेबलस्पून
*गुळ...छोट्या लिंबाएवढा
*तिखट... एक टीस्पून
*धणेपूड... एक टीस्पून
*जीरे पुड...1/2 टीस्पून
*मीठ...1 टीस्पून
*हळद...1/2 टीस्पून
*मोहरी...1/2 टीस्पून
*तेल...2 टेबलस्पून
कृती...
*कांदा ,मिरची ,कोथिंबीर ,आले व लसूण एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्या. पाणी शक्यतो घालू नका.
*वांग्यांना + च्या आकारात देठ न चिरता कापून घ्या.
*एका कढईत 1 टेबलस्पून तेल तापवून, वांगे मंद आचेवर परतून घ्या छान सोनेरी रंग आला पाहिजे. वांगे काढून बाजूला ठेवून द्या.
*कढईतील उरलेल्या तेलात अजून एक टेबलस्पून तेल घाला व मोहरी घालून तडतडल्यावर वरील कांद्याचे वाटण घाला ,मंद आचेवर बाजूने तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
*नंतर त्यात हळद, तिखट ,धने पूड व जिरेपूड घालून तीन मिनिटे परता
*मग त्यात खोबर्याचा किस, दाण्याचा व तिळाचा कूट घालून एकत्र करून अजून दोन मिनिटे परता
*परतलेले वांगे ,चिंचेचा कोळ व गूळ घाला, मग एक वाटी गरम पाणी घाला मंद आचेवर तीन-चार मिनिटे शिजू द्या.
*आपली भाजी तयार आहे...
*गरम गरम पोळी ,भाकरी ,वरण-भात कशासोबतही छान लागते.
टीप...
पुर्ण भाजी ही मंद आचेवरच करावी म्हणजे चव सुंदर येते.
Comments
Post a Comment