#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
फोडणीचे पोहे
हे नाव जरी घेतले तरी आपल्या डोळ्यांसमोर येते फिक्या पिवळ्या रंगाची पोह्यांची बशी... त्याच्यावर घातलेला तो हिरवागार कोथिंबीर... भुरभुरलेले खोबरे अहाहा...😋😋
मराठी मनात तर या पोह्यांना अढळ स्थान आहे असे म्हटले तरी हरकत नाही .
प्रत्येक घरचा आवडता नाश्ता... फोडणीचे पोहे ...
एवढेच कशाल अहो आज किती पिढ्यांचे संसार हे पोहे खाऊन तर जुळले आहेत...❤️ अजूनही आपल्याकडे दाखवण्याचा कार्यक्रम असताना आज आमच्याकडे चहा पोह्यांचा कार्यक्रम आहे असे सांगितले जाते ...
फोडणीचे पोहे हे झटपट होतात ...चवदार व चविष्ट तर लागतातच आणि आरोग्य शास्त्र सांगते की ते पौष्टिक पण आहेत .
पोह्यांमध्ये आयर्न आहे... त्या सोबत त्याला तेल ,मोहरी इतर मसाल्याचे घटक, लिंबू ,कांदा, मिरची यांची जोड...यामुळे ते अजूनच चवदार चविष्ट बनतात.
फोडणीचे पोहे हे प्रत्येक विभागानुसार अनेक प्रकारे बनतात ...आमच्याकडे फोडणीचे पोहे नुसता कांदा घालून, भरपूर हिंग व बटाटा घालून, मटार घालून ,फुलकोबी घालून, कांदे ,बटाटे ,फुलकोबी व मटर एकत्र करून अनेक प्रकारे बनतात... आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रकारच्या पोह्यांची चव अतिशय वेगळी व चविष्ट लागते
नागपूरचे सावजी स्टाईल बनवलेले चना पोहा हा प्रकार तर आता सगळीकडे लोकप्रिय झाला आहे...साधे फोडणीचे पोहे व त्याच्यासोबत झणझणीत रसदार अशी काळा हरबर्याची उसळ... इंदूरचे शेव घालून केलेले वाफेवरचे पोहे...
किती किती प्रकार.... 🤔🤔
पोहे हे उत्तम झाले तर खायला खूप छान लागतात ...ते मोकळे तर हवेच पण मउ व मुलायम सुद्धा हवे... तडतडीत व चिवट पोहे खायला मजा येत नाही..
खालील प्रकारे जर पोहे केले तर ते एक तासानंतर सुद्धा मउ व चवदार लागतात
आज केले आहेत खमंग असे कांदे पोहे...
साहित्य...
*जाड पोहे ...दोन वाट्या भरून

एक वाटी...200 मिली
*तेल... पाच टेबलस्पून
*कांदा मध्यम आकारात चिरून... एक वाटी *हिरव्या मिरच्या तिखट... तीन
*हळद ...पाव टी स्पून
*मोहरी ...पाव टी स्पून
*मीठ...दीड टीस्पून
*साखर... दीड टीस्पून
*लिंबू रस... दोन टीस्पून
*कोथिंबीर चिरून ...एक टेबल स्पून
*खोबरे कीस... एक टेबलस्पून
कृती...
*पोहे रोळीमध्ये घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या... पोहे बुडतील इतके पाणी घालून धुऊन घ्या व ती रोळीबाजूला ठेवून द्या.
*एका कढईत तेल तापवायला ठेवून मोहरी घाला, मोहरी तडतडल्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे व हळद घाला नंतर लगेच कांदा घालून त्याला मऊ होईपर्यंत परतून घ्या.
*मग त्यात मीठ,साखर व धुतलेले पोहे घाला, सगळे एकत्र करा.
*त्याच्यात एक टेबलस्पून पाणी व लिंबूरस घाला ,आणि सगळं छान एकत्र करून झाकण ठेवून मध्यम आचेवर तीन चार मिनिटं वाफ येऊ द्या.
*तीन-चार मिनिटांनी झाकण बाजूला काढून छान एकत्र करा.
*कोथिंबीर व खोबरे घालून गरम गरम पोहे सर्व्ह करा.

Comments
Post a Comment