#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#रेणूरसोई
पिठले...
पिठलं मुळातच चवदार व खमंग लागते.
"पिठले-भात"..."पिठले- भाकरी" ही महाराष्ट्रीयन जेवणाची खासियत...
नागपुर मध्ये बऱ्याच घरी खिचडी व पिठले करतात. मुळ नागपूरकर त्याला "चुन.. खिचडी"
असं म्हणतात...
साधे पिठले...पण प्रकार तरी किती...
पाण्याला उकळी आणून मग त्याच्यात वरून बेसन टाकून गाठी मोडुन वाफवलेले, बेसन पाण्यात कालवून मग फोडणी दिलेले, नुसतेच मिरची कोथिंबीर घातलेले ,जिरे खोबरे वाटण लावलेले ,ताकातले पिठले, दुधाचे पिठले, लसूणाचे पिठले, कांद्याचे पिठले ,टमाट्याचे पिठले , कुळीथाच्या पिठाचे आमसूल घालून केलेले पिठले, शेवग्याच्या शेंगा घातलेले पिठले, कांदा टमाटा एकत्र केलेले पिठले, रावण पिठले...
आणि हे सगळे प्रकार चवीला वेगवेगळे लागतात...
आज मात्र मी अजून एक नवीन प्रकारच्या पिठल्या ची रेसिपी देणार आहे...
हा प्रकार मी पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातचा खाल्ला....मला फार आवडला... आणि अजून तरी त्या सोडून बाकी कोणी केलेला खाल्लेला नाही... मस्तच करतात त्या हे पिठले...
लवंगी चे पिठले....
साहित्य...
*बेसन... एक वाटी

एक वाटी...150 मिली
*तेल ... 4 टेबलस्पून
*हिरव्या मिरच्या... चार चिरून
*तिखट ...एक टीस्पून
*मीठ...1 टीस्पून
*लवंगा पूड करून...पाच ते सहा
*पाणी ...अडीच वाट्या
*हिंग...पाव टी स्पून
*हळद...पाव टीस्पून
*मोहरी व जिरे...पाव टीस्पून प्रत्येकी
*कोथिंबीर चिरून...एक टेबल स्पून
कृती...
*बेसनामधे हळूहळू पाणी घालून मिश्रण एकजीव करावे. फक्त 2 वाटी पाणी घाला... बाकी पाणी राहू द्या. हे मिश्रण कमीत कमी एक तास भिजवून ठेवा.
*एका लोखंडी कढईत तेल तापवून मोहरी, जिरे घालून फोडणी करावी.
*त्यात हिंग, हळद व मिरची तुकडे घालून लगेच लाल तिखट व उरलेले 1/2 वाटी पाणी घाला.
*उकळी आल्यावर मीठ, लवंग पूड व कालवलेले बेसन घालून ढवळावे. छान एकत्र करून झाकून ठेवा.
*दोन मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा हालवुन घेऊन, बेसन शिजून घट्ट होऊ द्या.
*गॅस बंद करून, कोथिंबीर घाला.
*गरमागरम पिठले भाकरी किंवा भात, पोळी सोबत छान लागते 😋.

Wow! Masstach!
ReplyDeleteThanks 🙏☺️
DeleteYummy 😋
ReplyDeleteThanks 🙏
Delete