बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#रेणूरसोई
#झटपट #दोसा
सकाळच्या घाईच्या वेळेत, स्वयंपाक व नाश्ता हे दोन्ही आटपून 9 वाजता ऑफिससाठी घराबाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरत😊.
त्यात माझा दिवसाची सुरुवात होणारा नाश्ता हा पोषक असावा ह्या गोष्टीवर भर असतो.
मग अशावेळेस खुप युक्ती लढवाव्या लागतात.
आज त्यातीलच एक चवदार प्रकार...
खमंग दोसा...बिना चटणीचा तरी चवदार...
लोखंडी तवा वापरून हि पटकन होणारा...
झटपट दोसा...
साहित्य...
जाड तांदुळ..3 वाटी
उडीद डाळ...1 वाटी
मेथीदाणा...1 tsp
मीठ.... 3.5 tsp
जाड पण तिखट हिरवी मिरची ..4,5
खोबरेल तेल...1/2 वाटी
कृती....
तांदुळ, डाळ स्वछ धुवून व मेथीदाणे घालुन 4..5 तास भिजवा.
मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या, फार पातळ वाटु नका.
रात्रभर आंबवुन घ्या.
सकाळी त्यात मीठ घालून, मिक्स करा, गरज वाटली तर 1 वाटी पाणी घालून पातळ करा.
गॅसवर स्वच्छ घासलेला लोखंडी तवा 5 मिनिटे तापवत ठेवा.
गॅस कमी करून , त्यावर 2 tsp तेल पसरवून अजून 3 मिनिटे तापवा.
आपला तवा दोसे करायला सिद्ध झाला.
तवा मंद गॅसवर करा, 2..3 थेंब तेल घालून पसरवा, 2 मोठे चमचे भरून पीठ घाला, झटपट गोल पसरवा.
खुप पातळ नको, जाडसर ठेवा.
त्यावर मिरची चे तुकडे आवडी प्रमाणे घाला, छान चव येते.
बाजूने 2 tsp तेल गोलाकार घाला, दोस्यावर पण 1/2 tsp तेल पसरवा.
2 मिनिटे झाकण ठेवा, झाकण काढुन सराट्याने हलकेच सोडवून घ्या.
दुसऱ्या बाजूने 1/2 tsp तेल सोडून 1 मिनिटं ठेवा.
कुरकुरीत पण मऊ व आंबुस दोसे तयार.
मिरची नको असल्यास खाण्या आधीच वेगळी काढून ठेवा.
पुन्हा वापरता येते, मिरचीची छान चव येते.
सिमला मिरची पण घालु शकता.

Nice
ReplyDeleteThanks 🙂
DeleteMasta Renu tai
ReplyDeleteThanks 🙂
Deleteअप्रतिम
ReplyDeleteThanks 🙏
DeleteKhub chan 👌
ReplyDeleteThanks 🙏
DeleteWow, Great! can I use rice flour instead?
ReplyDeleteYes... but it will taste differenly.
DeleteIt should be fremented well with grinded Udid Dal.
Delicious
ReplyDeleteMastch Tai 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete