#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#रेणूरसोई
#मुग #पराठा
मूग डाळीचा पराठा
पराठा हा प्रकार अतिशय चवदार व खमंग लागतो. पण ते छान खुसखुशीत व खमंग गुलाबी रंगावर भाजलेले असले पाहिजे.
मुगडाळी चा हा पराठा फार सुंदर लागतो.
कार्बोहाइड्रेट्स व प्रोटीन्स दोन्ही असल्यामुळे सोबत डब्यात दही व एखादे फळ दिले की परिपूर्ण आहार....
झटपट होतो व छान लागतो...ह्या पराठ्याची चव नेहमी पेक्षा थोडी वेगळी मस्त आहे.
साहित्य...
*मुगाची पिवळी डाळ ...अर्धी वाटी
*कणीक...एक वाटी किंवा थोडी जास्त
*शोप जाडसर पूड...एक टिस्पून
*धनेपूड...अर्धा टीस्पून
*जीरे...पाव टीस्पून
*मीठ...दीड टीस्पून
*तिखट...एक टीस्पून
*हळद...पाव टीस्पून
*तेल... तीन टीस्पून... मोहन म्हणुन
*तेल पराठे शेकण्यासाठी... आवश्यकतेनुसार
कृती...
*मुगडाळ स्वच्छ धुऊन, एक वाटी पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.
*छान घोटुन घ्या, व कणीक, तेल, मीठ, तिखट, हळद, शोप व धनेपूड, जीरे घालून छान एकत्र करा.
*गरज असेल तर थोडे पाणी किंवा कणीक घालून घट्ट गोळा भिजवून घ्या. दहा मिनिटे मुरायला ठेवा.
*नंतर छान चुरून, सात गोळे करा.
*पोळपाटावर परोठे लाटुन, तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून मग थोडं तेल लावून शेकून घ्या.
*डब्यात देताना दही.. लोणचे.. ठेचा.. लोणी.. तूप जे आवडेल ते द्या.

Comments
Post a Comment